डास चावल्यानंतर खाज का येते? कोणत्याही ऋतूत 'या' ७ उपायांनी करा डासांपासून बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 05:28 PM2020-09-07T17:28:03+5:302020-09-07T17:36:25+5:30
तुम्हाला डास का चावतात? डास चावल्यानंतर त्वचेवर येणारी सूज कशी रोखता येऊ शकते. याबाबत अधिक माहिती देणार आहोत.
डास चावल्यानंतर नेहमी त्वचेवर खाज येते. कधी पुळ्या तर कधी संपूर्ण त्वचा लाल होते. संध्याकाळनंतर दरवाज्याच्या फटीतून किंवा खिडकीतून घरात डास यायला सुरूवात होते. डास येऊ नयेत म्हणून दारांसह खिडक्याही जास्तवेळ बंद ठेवल्यास हवा खेळती राहत नाही. श्वास कोंडला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला डास का चावतात? डास चावल्यानंतर त्वचेवर येणारी सूज कशी रोखता येऊ शकते. याबाबत अधिक माहिती देणार आहोत.
जेव्हा डास चावतात तेव्हा माणसांच्या शरीरातील रक्त पितात. त्यानंतर आपली लाळ त्याच ठिकाणी सोडतात. म्हणून डास चावल्यानंतर सूज येते. डासांच्या लाळत एंजाईम्स आणि प्रोटीन्स असतात. त्यामुळे शरीरात anticoagulants तयार होऊन एलर्जी होते.
डास चावल्यानंतर खाज का येते
डास चावल्यानंतर त्वचेवर एक छिद्र तयार होते. त्यामुळे रक्तवाहिन्या प्रभावित होतात. डासांना रक्त पिता यावं आणि रक्त गोठू नये म्हणून एक डास रसायन शरीरात सोडतात. त्यामुळे काही वेळासाठी शरीराताल रक्त गोठत नाही कारण डासांची लाळ anticoagulant स्वरुपात कार्य करते. डासांच्या लाळेत केमिकल्स असल्यामुळे शरीरात प्रवेश केल्यानंतर खाज येऊन त्वचा लाल होऊन सुजते.
या उपायांनी डासांपासून त्वचेचं रक्षण करा
डास चावल्यानंतर त्वचेवर मधाचा वापर तुम्ही करू शकता. मधात अनेक एंटीसेप्टिक आणि एँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे जखमेवर मध लावल्यास लवकर बरं होण्यास मदत होते.
डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा. याचा परिणाम साधारणतः 8 तास राहतो.
डास चावल्यास तुम्ही एलोवेराजेलचाही वापर करू शकता. एलेवेरा जेल त्वचेसाठी चांगले असते. एलोवेरात असलेले औषधी गुणधर्म डास चावल्यानंतर येणारी खाज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुमच्या घराच्या आजूबाजूला एलोवेराचं रोपटं असेल तर तुम्ही फ्रेश एलोवेराचा वापर करू शकता. एलोवेरा जेल सुद्धा खाज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
चहामध्ये टॅनिन हा घटक असतो. त्वचेची सुज कमी करण्यासाठी टॅनिन एसिडचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी प्रभावीत जागेवर फक्त टी बॅग लावा. धुतल्यानंतर पाच मिनिटं तसंच राहू द्या. या उपायामुळे जळजळ आणि खाज कमी होऊ शकते.
केमिकल्सविरहीत उपाय म्हणून तुम्ही टी ऑईलचा वापर करू शकता. त्यात अनेक एंटी बॅक्टेरियल आणि एटीसेप्टिक गुण असतात. सुज आणि लाल झालेल्या त्वचेसाठी टी ऑईलचा वापर केला जातो. त्यासाठी शेविंग केल्यानंतर तुम्ही कापसाला हे तेल लावून त्वचेवर लावा.
याशिवाय खाज किंवा कोणत्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन झाल्यास तुळशीच्या पानांच्या वापर उत्तम ठरतो. तुळशीची पानं वाटून प्रभावित जागेवर लावल्यास आराम मिळेल.
आजार टाळण्यासाठी प्रथम स्वच्छता महत्त्वाची आहे. घराभोवती, इमारतीच्या गच्चीवर पाणी साचू देवू नये, घरातील पाणी साठवणीची भांडी आठवड्यातून किमान एकदा कोरडी करावी. पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. तपासणीसाठी घरी येत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
हे पण वाचा-
खुशखबर! ३ महिन्यानंतर आपोआप चांगली होताहेत कोरोनामुळे संक्रमित झालेली फुफ्फुसं, तज्ज्ञांचा दावा
CoronaVirus : चिंताजनक! २०२३ पर्यंत कोरोना विषाणू पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा