रोज काय खाता? ज्यामुळे होऊ शकता हृदयरोगाचे शिकार, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 12:28 PM2022-09-29T12:28:22+5:302022-09-29T12:28:40+5:30
Health Tips : जर्नल लॅंसेट इसिलीनिकल मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, वेगवेगळ्या भाज्या, हिरव्या भाज्यांचा आहार हृदयरोगाचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
Health Tips : आपल्या आहाराचा आपल्या आरोग्यावर प्रभाव होतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे तज्ज्ञ नेहमी संतुलित आहार घेण्याचा सल्ला देत असतात. पण काही लोक हे रोजच मांस, सोया किंवा नट्ससारखे हाय प्रोटीन असलेले पदार्थ खातात. मात्र, या पदार्थांचं रोज सेवन करणं हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरतं. रिसर्चनुसार, मीट आणि इतर उच्च प्रोटीन असलेल्या पदार्थांमध्ये सामान्यपणे सल्फर एमिनो अॅसिड अधिक असतं. हे हृदयासाठी चांगलं नसतं. जर्नल लॅंसेट इसिलीनिकल मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, वेगवेगळ्या भाज्या, हिरव्या भाज्यांचा आहार हृदयरोगाचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात. तेच मांस शरीराचं नुकसान करू शकतं.
११ हजार लोकांवर सर्व्हे
या रिसर्चचे मुख्य लेखक जेन डोंग यांच्यानुसार, त्यांनी २०१८ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये पाहिलं की, सल्फर अमिनो अॅसिड आहारामध्ये जास्तीत जास्त आहार जनावरांशी कुठेना कुठे जुळलेला असतो. एका नवीन रिसर्चमध्ये अभ्यासकांनी ११ हजार लोकांच्या आहाराची आणि रक्त बायोमार्करची तपासणी केली. त्यातून असं आढळून आलं की, या लोकांनी कमी सल्फर अमिनो अॅसिड असलेले खाद्य पदार्थ खाल्ले होते. त्यांना रक्त तयार करण्यात आणि पचनाची कोणतीही समस्या नव्हती.
वाढू शकतो बीपी आणि डायबिटीसचा धोका
अभ्यासकांनी कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, ग्लूकोज आणि इन्सुलिनसहीत १० ते १६ तासांच्या उपवासानंतर सहभागी लोकांच्या रक्तात काही बायोमार्करच्या स्तराच्या आधारावर एक मिश्रित कार्डिओमेटाबॉलिक रोगाचा धोका असण्याचं एक प्रमाण तयार केलं. हे बायोमार्कर एखाद्या व्यक्तीला होणाऱ्या आजाराचे संकेत आहेत. जसे की, उच्च कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हृदयरोगाचं कारण आहे.
अभ्यासकांना या रिसर्चमधून असे आढळले की, ज्या लोकांना हृदयाशी संबंधित समस्या होती, त्यांच्यात सरासरी सल्फर अमिनो अॅसिडचं सेवन ठरलेल्या आवश्यकतेपेक्षा अडीच पटीने अधिक होतं. अधिक सल्फर अमिनो अॅसिडचं सेवन मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या संभावित हृदयाशी निगडीत समस्यांकडे संकेत करत होतं. तेच धान्य, कडधान्य, भाज्या आणि फळांचं सेवन सोडून मांस अधिक खाल्ल्यासही हृदयाशी संबंधित समस्या होऊ शकते.
फळ-भाज्या बेस्ट पर्याय
अभ्यासकांनी सांगितले की, मेथिओनिन आणि सिस्टीनसहीत सल्फर अमिनो अॅसिड नावाचं तत्व चयापचय आणि आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या भूमिका निभावतं. मीट आणि इतर हाय प्रोटीन खाद्य पदार्थात सामान्यपणे सल्फर अमिनो अॅसिड अधिक असतं. याउलट जे लोक फळं आणि भाज्या खातात त्यांच्यात कमी सल्फर अमिनो अॅसिड असतं. त्यामुळे त्यांचं हृदय निरोगी राहतं.