Heart attack : कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यात तरूणांना असतो हार्ट अटॅकचा जास्त धोका?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:11 PM2022-10-22T12:11:26+5:302022-10-22T12:11:37+5:30

Heart Attack : एका रिसर्चमध्ये, हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. या रिसर्चनुसार, हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका कधी होऊ शकतो, याची माहिती घेऊन हार्ट अटॅकपासून बचाव करता येतो. 

Health Tips : Highest risk heart attack week, day and month youth | Heart attack : कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यात तरूणांना असतो हार्ट अटॅकचा जास्त धोका?

Heart attack : कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यात तरूणांना असतो हार्ट अटॅकचा जास्त धोका?

Next

Heart Attack : बदलत्या जीवनशैलीने लोकांच्या आरोग्यावर फार प्रभाव टाकला आहे. काही आजार असे असतात, जे एका ठराविक वयानंतर होण्याची शक्यता असते. पण अलिकडे असे आजार तरूणांमध्येही होऊ लागले आहेत. एका रिपोर्टवर विश्वास ठेवायचा तर अलिकडच्या वर्षांमध्ये तरूणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण अधिक वेगाने वाढत आहे. हार्ट अटॅकचा धोका कोणत्याही वयात होऊ शकतो. पण तरूणांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वेगाने वाढत आहे. एका रिसर्चमध्ये, हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. या रिसर्चनुसार, हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका कधी होऊ शकतो, याची माहिती घेऊन हार्ट अटॅकपासून बचाव करता येतो. 

काय सांगतो रिसर्च?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा रिसर्च करण्यासाठी ७ वर्षांचा कालावधी लागला आणि १५, ६०० हॉस्पिटलच्या हार्ट अटॅकच्या रूग्णांच्या डेटाची पाहणी केली. तर रिसर्चमधून अनेक धक्कादायक तथ्य समोर आलेत. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, लोकांना सोमवारी सर्वात जास्त हार्ट अटॅक येतात. तेच सर्वात कमी हार्ट अटॅकचा धोका शनिवारी असतो. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, सोमवारी आठवड्यातील इतर दिवसांच्या तुलनेत हार्ट अटॅकचा धोका ११ टक्क्यांनी अधिक असतो. आधी हार्ट अटॅकच्या कारणामुळे झालेला तणाव दुसऱ्या हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतो.

तसेच या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जे तरूण नोकरी करतात त्यांना सोमवारी हार्ट अटॅकचा धोका सर्वात जास्त राहतो. तसेच असेही सांगण्यात आले आहे की, सोमवारी कामाचा ताण जास्त असतो त्यामुळे असं होतं. जे तरूण नोकरी करतात, त्यांच्यात इतर लोकांच्या तुलनेत सोमवारी २० टक्क्यांनी अधिक हार्ट अटॅकचा धोका राहतो.

कोणता महिना धोकादायक?

हार्ट अटॅकशी संबंधित या रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, डिसेंबर महिन्यात हार्ट अटॅकचा धोका सर्वात जास्त असतो. तेच सर्वात कमी धोका जुलै महिन्यात राहतो. 

तरूणांमध्ये हार्ट अटॅकचं मुख्य कारण

या रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, कोणतीही व्यक्ती असो पण तणाव जास्त असेल तेव्हा हार्ट अटॅकचा धोका सर्वात जास्त असतो. तणाव किंवा स्ट्रेसमुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात, जे हार्ट अटॅकचा धोका वाढवतात.

बचावासाठी उपाय

हार्ट अटॅकचा धोका तरूणांमध्ये वाढत आहे. हे बघताना तरूणांनी आपल्या खाण्या-पिण्यावर आणि लाइफस्टाईलवर विशेष लक्ष दिलं पाहिजे. हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, जे लाइफस्टाईलमध्ये फॉलो करावेत.  या उपायांमध्ये रोज एक्सरसाइज करणे, तणावा-चिंता कमी करणे, तणाव दूर करण्यासाठी पर्याय शोधणे, आहारातून पोषक तत्वांचं सेवन करणे,  अल्कोहोल, सिगारेट किंवा इतर कोणतेही मादक पदार्थांचं सेवन करून नये.

Web Title: Health Tips : Highest risk heart attack week, day and month youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.