घशातील खवखवीमुळे वैतागलात? झोपण्यापूर्वी करा 'हा' घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 05:13 PM2023-11-22T17:13:14+5:302023-11-22T17:22:16+5:30

Winter Care Tips : मधाने घशातील खवखवीसोबतच खोकलाही दूर होतो आणि झोपही चांगली येते

Health Tips : Honey is effective for bad throat home remedy | घशातील खवखवीमुळे वैतागलात? झोपण्यापूर्वी करा 'हा' घरगुती उपाय

घशातील खवखवीमुळे वैतागलात? झोपण्यापूर्वी करा 'हा' घरगुती उपाय

Winter Care Tips : जसजशी थंडी वाढते वातावरणातील बदलामुळे आणि बदलत्या हवेमुळे सर्दी-खोकल्याची समस्या होणे सामान्य बाब आहे. त्यासोबतच आणखी एक समस्या होते ती म्हणजे घशात खवखव होते. अशावेळी अनेकजण घशाला आराम मिळावा म्हणून मध चाटण्याचा सल्ला देतात. जेष्ठमध, आलं आणि लिंबाचा रस चाखण्याचा सल्ला लोक देतात. याने वेगवेगळ्या समस्या दूर होतात. मधाने घशातील खवखवीसोबतच खोकलाही दूर होतो आणि झोपही चांगली येते.

मधाचा फायदा?

मधात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-मायक्रोबियल तत्व असतात. या तत्वांमुळे घशातील खवखव वाढवणारे बॅक्टेरिया कमी केले जातात. लिंबाच्या रसाने तयार केली गेलेल्या लेमन टी मध्ये थोडं मध घातलं तर आराम मिळतो. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मधाने खोकला कमी होतो.

लहान मुलांसाठी मध फायदेशीर

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, ज्या लहान मुलांना झोपताना किंवा दिवसा खोकल्याची समस्या अधिक होते. त्यांना रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध चाटण्यास दिलं पाहिजे. असं केल्याने लहान मुलांना चांगली झोप येते आणि त्यांचा खोकलाही कमी होतो. 

पण एक वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांना मध देऊ नये. कारण यात बोटुलिनम बीजाणू असतात. हे तत्व मोठ्या मुलांसाठी आणि वयस्कांसाठी नुकसानकारक नसते. पण एक वर्षापेक्षा कमी लहान मुलांसाठी घातक ठरू शकतात. वर्षभरात लहान मुलांचं इम्यून सिस्टीम कमजोर होतं आणि ते यापासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करू शकत नाहीत.

Web Title: Health Tips : Honey is effective for bad throat home remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.