Health Tips: गजरा माळण्याचा आरोग्याशी थेट संबंध कसा आहे? जाणून घ्या आणि आजारांना दूर ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 12:20 PM2023-04-14T12:20:04+5:302023-04-14T12:21:06+5:30

Health care: गजरा माळण्याची परंपरा तशी जुनीच, पण तो केवळ सौंदर्यात भर घालतो असे नाही तर आरोग्यही जपतो; कसे ते पहा!

Health Tips: How is gajra mala directly related to health? Know and keep diseases at bay! | Health Tips: गजरा माळण्याचा आरोग्याशी थेट संबंध कसा आहे? जाणून घ्या आणि आजारांना दूर ठेवा!

Health Tips: गजरा माळण्याचा आरोग्याशी थेट संबंध कसा आहे? जाणून घ्या आणि आजारांना दूर ठेवा!

googlenewsNext

गजरा पाहून मन प्रफुल्लित होते. गजर्याच्या घमघमाटाने वातावरण सुगंधी होते. पूर्वीच्या बायका सणासुदीलाच नाही तर दररोज स्वतःच्या हातांनी गुंफून तयार केलेला गजरा माळायच्या, देवालाही वाहायच्या. लग्न समारंभात तर गजऱ्याला केवढा तरी मान. आजही दक्षिणेकडील स्त्रिया आवडीने गजरा माळतात. गजरा सौंदर्यात भर तर घालतोच शिवाय आरोग्यही उत्तम ठेवतो. कसे? चला जाणून घेऊया सचिन जोग यांच्या लेखणीतून!

गजरा हा "old fashioned" आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?...

गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्या शिवाय नोकरीला जात नाहीत.

'गजरा - सौंदर्य' या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिल तर मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातचं केली गेली आहे हे लक्षात येतय का ? 

आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो. मन शांत करतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच.

स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या 'pituitary gland' च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा, किंवा फुलांचा वास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथी चे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते. परिणामी स्त्रीयांच्या आरोग्यामधील संतुलन रहाण्यास मदत होते..

मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे. स्त्रीयांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण "concentration", "moto development" करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाक थेरपी, अरोमा थेरपी या काय आहेत. फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत.

त्यामुळे भरगच्च पैसे देऊन पाश्च्यात्यांप्रमाणे अरोमा थेरपी घेण्यापेक्षा भारतीय पद्धती प्रमाणे गजरा माळून सौंदर्यात आणि आरोग्यात भर घालू. 

Web Title: Health Tips: How is gajra mala directly related to health? Know and keep diseases at bay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.