फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर; नेहमी निरोगी राहण्यासाठी 'असा' घ्या आहार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:59 PM2020-06-17T16:59:17+5:302020-06-17T17:00:19+5:30

या उपायांचा वापर करून तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.

Health tips : How to make lungs healthy by daily diet | फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर; नेहमी निरोगी राहण्यासाठी 'असा' घ्या आहार 

फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर; नेहमी निरोगी राहण्यासाठी 'असा' घ्या आहार 

googlenewsNext

घरातील एका व्यक्तीला सर्दी, खोकल्याची समस्या झाल्यास संपूर्ण कुटुंबात पसरण्याचा धोका असतो. सध्या  कोरोना विषाणूंची माहामारी असल्यामुळे लोकांना आजारी पडण्याची भीती वाटत आहे. कारण आपल्यामुळे लहान मुलांना तसंच वयस्कर व्यक्तींना त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्यामुळे आपल्याला समस्येचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही स्वतःची फुफ्फुसं चांगली ठेवू शकता.

लसूण आणि कांदा

लसूण आणि कांदा हे दोन असे पदार्थ आहेत. त्यामुळे फुफ्फुसांना मजबूती येण्यास मदत मिळते. यात अनेक एँटीऑक्सीडेंट्स आणि एँटीफंगल गुण असतात. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये धुळीचे कण, किटाणू जमा होण्यापासून रोखता येते. परिणामी फुफ्फुसं सुरक्षित राहतात. 

ओमेगा थ्री फॅटी एसिड

ओमेगा थ्री फॅटी एसिड्स मिळणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे फुप्फुसांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. दूध, पनीर, दही, आळशीच्या बीया या पदार्थाचे सेवन करून तुम्ही शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढू शकता. 

डाळिंब आणि सफरचंद

डाळिंबाच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघत असते. याशिवाय शरीरातील रक्तची कमतरता भरून काढण्यासाठी ही फुफ्फुसं चांगली राहणं गरजेंच असतं. त्यात व्हिटामीन  ई आणि सी असते.  लंग्स कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी या पदार्थाचा आहारात समावेश करायला हवा. 

आलं आणि आयुर्वेदिक चहा

आलं, तुळस, जेष्ठमध, लवंग, वेलची हे पदार्थ टाकून तयार केलेला चहा प्यायल्याने फुफ्फुस निरोगी राहू शकतात. श्वास घेण्यास त्रास होणं, सर्दी, खोकला अशा समस्या कमी होण्यास मदत होते. याशिवाय फुफ्फुस आयुष्यभर चांगली ठेवायची असतील तर मादक पदार्थाचे सेवन करू नका. जेणेकरून फुफ्फुसांमध्ये घातक पदार्थ जमा होणार नाही.

रोज १ ग्लास तुळशीच्या दुधाचे सेवन कराल; तरच प्रतिकारशक्ती वाढवून संक्रमणाशी लढू शकाल

मास्क लावल्यानंतरही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? तज्ज्ञांनी सांगितले यामागचं कारण

Web Title: Health tips : How to make lungs healthy by daily diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.