कोरोनाकाळात पाण्यााद्वारे पसरणाऱ्या आजारांपासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:57 PM2020-09-01T15:57:30+5:302020-09-01T16:04:34+5:30
आजारी पडून दवाखान्यात जाण्याआधीच घरगुती पदार्थांनी तुम्ही स्वतःची काळजी घेतली तरी आजारांपासून लांब राहू शकता.
पावसाच्या वातावरणात वेगवेगळ्या आजाराचं संक्रमण पसरण्याचा धोका असतो. यामुळे ताप, सर्दी, खोकला मुख्य म्हणजे पोटाच्या समस्या सर्वाधिक उद्भवतात. कारण पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यातून किंवा सांडपाण्याद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. पण आजारी पडून दवाखान्यात जाण्याआधी घरगुती पदार्थांनी तुम्ही स्वतःची काळजी घेतली तरी आजारांपासून लांब राहू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्या पदार्थांचा समावेश तुम्ही आहारात करायला हवा जेणेकरून पाण्याद्वारे पसरत असलेल्या संसर्गजन्य आजारांपासून लांब राहता येईल.
तुळस
तुळशीतील औषधी गुणांमुळे तुळशीचा समावेश औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. तुळशीच्या सेवनाने शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्ट्या व्यक्ती प्रबळ होण्यास मदत होते. एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी व्हायरल गुण तुळशीत असतात त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. नियमित तुळशीचं दूध किंवा तुळशीच काढा प्यायल्यानं आरोग्य चांगले राहते. पावसाळ्यात वातावरणात गारवा पसरलेला असतो. तुळशीचं पाणी किंवा तुळशीची पानं खाल्यानं शरीरातील गरमी टिकून राहण्यास मदत होते.
लसूण
जे लोक सकाळी लसूण खातात. त्यांची पचनक्रिया नेहमी व्यवस्थित राहते. यामुळे पोटाचे विकार दूर होतात. वजन कमी करण्यासाठीही लसणाचं सेवन फायदेशी ठरतं. रक्त गोठण्याची समस्या अनेकांना उद्भवते. लसूण खाल्ल्यानं रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे ब्लड क्लोटिंग थांबतं. जर तुम्हाला नुसता लसूण खाणं जमत नसेल तर तुम्ही भाज्यामध्ये जास्तीत जास्त लसणाचा वापर करू शकता. लसूणात अॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असल्यास गंभीर आजारांपासून लांब राहता येतं.
पुदिना
पुदिना कोणत्याही ऋतूत सहज उपलब्ध होतो. जर आपल्याला पोटासंबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान प्रमाणात मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो. सर्दी, तापाची समस्या उद्भवल्यास पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी,थोडं काळं मीठ घाला आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.
टॉमॅटो
टॉमॅटोत अनेक एंटीऑक्सिडंट्स असतात. रक्त शुद्धीकरण करण्यासाठी, शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तसंच संक्रामक रोगांपासून बचाव करण्यासाठी टॉमॅटो फायदेशीर ठरतो. टॉमॅटोच्या सेवनानं शरीराला उर्जा मिळते. तुम्ही टॉमॅटो सूप किंवा भाज्यांच्या माध्यमातूनही टॉमॅटोचं सेवन करू शकता. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळतील.
हे पण वाचा
नाष्त्याला पोहे खाण्याचे 'हे' ५ आरोग्यदायी फायदे वाचाल; तर रोज आवडीनं खाल
खुशखबर! इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही उपचारांशिवाय मानवी शरीरानं केली HIV वर मात
कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांसह 'या' अवयवांवर होत आहे गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा दावा