जेवण केल्यावर छातीत जळजळ होते? तर अशाप्रकारे झोपण्याची ही सवय सोडा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 04:54 PM2023-02-17T16:54:46+5:302023-02-17T16:55:59+5:30

Health Tips : ही एक सामान्य समस्या आहे. पण वेळीच यावर उपचार केले नाही तर वेगवेगळ्या समस्येंचा सामना करावा लागतो. पण ही समस्या झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही होऊ शकते, हे अनेकांना माहीत नसतं.

Health Tips : How to cure acid reflux heartburn may happe due to your sleeping position | जेवण केल्यावर छातीत जळजळ होते? तर अशाप्रकारे झोपण्याची ही सवय सोडा...

जेवण केल्यावर छातीत जळजळ होते? तर अशाप्रकारे झोपण्याची ही सवय सोडा...

googlenewsNext

How To Cure Acid Reflux: अनेकदा आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे आणि लाइफस्टाईलमुळे छातीत किंवा गळ्यात जळजळ होण्याची समस्या होते. या समस्येला  हार्टबर्न किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स असं म्हटलं जातं. ही एक सामान्य समस्या आहे. पण वेळीच यावर उपचार केले नाही तर वेगवेगळ्या समस्येंचा सामना करावा लागतो. पण ही समस्या झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही होऊ शकते, हे अनेकांना माहीत नसतं.

काय आहे अॅसिड रिफ्लक्स?

अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा हार्ट बर्न डायजेशनसंबंधी एक समस्या आहे. यात जे अ‍ॅसिड आपलं अन्न पचवण्यासाठी असतं ते फूड पाइप म्हणजे ओएसोफेगसच्या माध्यमातून आपल्या गळ्यापर्यंत येतं. ज्यामुळे समस्या निर्माण होते. 

अ‍ॅसिड रिफ्लक्सची मुख्य लक्षणे

पोटातील अ‍ॅसिड गळ्यापर्यंत येणे

गळ्यात आंबटपणा जाणवणे

छाती किंवा गळ्यात जळजळ होणे

अन्न गिळण्यात समस्या होणे

गळ्यात का होते जळजळ?

आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी जे अ‍ॅसिड रिलीज होतं ज्याला पचन रस म्हटलं जातं. जेव्हा अन्न फूड पाइपने पोटाकडे जाऊ लागतं तेव्हा इसोफेजिअल स्फिंक्चर नावाचा एक वॉल्व ओपन होतो आणि अन्न पोटात पोहोचतं. जेव्हा अ‍ॅसिडचं प्रमाण जास्त होतं ते फूड पाइपच्या माध्यमातून गळ्यापर्यंत येऊ लागतं. ज्यामुळे ही समस्या होते.

कसं झोपल्याने होते ही समस्या

गळ्यात जळजळ होण्याचा संबंध तुमच्या स्पीपिंग पोस्चरशी संबंधित आहे. जर तुम्ही पोटावर किंवा पाठीवर जास्त झोपत असाल तर याने अ‍ॅसिड रिफ्लक्सची शक्यता जास्त वाढते. यामुळे जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, तुम्ही एका कडेवर झोपा. जेणेकरून ही समस्या होणार नाही.

Web Title: Health Tips : How to cure acid reflux heartburn may happe due to your sleeping position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.