Health Tips : उन्हाळ्यात वाढू शकते नाकातून रक्त येण्याची समस्या, 'या' सोप्या घरगुती उपायांनी करा बचाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 03:04 PM2022-03-30T15:04:41+5:302022-03-30T15:04:59+5:30
Home Remedies for Nose Bleeding: नाकातून रक्त येण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, अॅलर्जी, आतील नसा किंवा ब्लड वेसल्स डॅमेज असणं, जास्त उष्णता, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, सायनस, मलेरिया, टायफॉइड, जास्त शिंका इत्यादी.
Home Remedies for Nose Bleeding: उन्हाळा लागला की, अनेक लोकांना नाकातून रक्त येण्याची समस्या होऊ लागते. जर वेळीच नाकातून येणारं हे रक्त रोखलं नाही तर मोठं नुकसानही होऊ शकतं. नाकातून रक्त येताना दिसलं कोणतीही व्यक्ती घाबरेल. त्यामुळे अनेकदा ते बेशुद्ध होतात. त्यांना चक्कर येऊ लागते. अनेकदा भीषण तापमानामुळे नाकातून रक्त येऊ लागतं.
नाकातून रक्त येण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, अॅलर्जी, आतील नसा किंवा ब्लड वेसल्स डॅमेज असणं, जास्त उष्णता, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, सायनस, मलेरिया, टायफॉइड, जास्त शिंका इत्यादी. पण याला फार घाबरण्याची गरज नाही. जर तुम्हाला कामानिमित्त जास्त बाहेर जावं लागत असेल तर काही उपाय तुम्हाला माहीत असले पाहिजे. याने लगेच नाकातून येणारं रक्त बंद होतं.
- व्यक्ती नाकातून रक्त येऊ लागलं तर त्याला लगेच खाली जमिनीवर झोपवा. जेणेकरून नाकातून येणारा रक्तप्रवाह बंद होईल. याने चक्कर येणे, घाबरल्यासारखं वाटणे, भीती याची समस्या दूर होतील.
- एसेंशिअल ऑइलनेही सुद्धा ही समस्या रोखली जाऊ शकते. यासाठी तुम्ही लॅवेंडर ऑइलचे काही थेंब एक कप पाण्यात टाका. पाण्यात पेपर टॉवेल भिजवून बाहेर काढा आणि त्याचं पाणी पिळून घ्या. हा पेपर नाकावर ठेवा. तुम्ही या पाण्याचे काही थेंबही नाकात टाकू शकता. याने तुम्हाला फायदा होईल.
- नाकातून रक्त येत असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर थंड पाणी टाकावं. एक कपड्यात बर्फ गुंडाळून तो नाकावर काही वेळासाठी लावून ठेवा. याने नाकातून येणारं रक्त लगेच बंद होईल.
- कांद्याच्या रसानेही नाकातून येणारं रक्त थांबवलं जाऊ शकतं. कांद्याचा थोडा रस काढा. कापसाच्या बोळ्याने हा रस नाकाला लावा आणि दोन-तीन मिनिटे तसाच राहू द्या. तसेच कापलेला कांदा नाकाजवळ धरला तर त्यानेही ब्लड क्लॉटिंगसाठी मदत मिळते.
- व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तुमच्या चेहऱ्याचं आणि केसांचं सौंदर्य वाढवते. या कॅप्सूलमधील ऑइल नाकावर कापसाच्या मदतीने लावा आणि थोड्या वेळासाठी व्यक्तीला बेडवर झोपवला. जेव्हाही नाक ड्राय वाटेल या तेलाचा वापर करा. याने त्वचेवर ओलावा निर्माण होतो. याने नाकातून येणारं रक्तही बंद होतं.
(टिप - वरील लेखातील सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. हे उपाय करण्याआधी तज्ज्ञांशी एकदा नक्की बोला.)