Health Tips: दीर्घायुष्य मिळावं असे वाटत असेल तर चाळिशीनंतर 'हे' उपाय ताबडतोब अंमलात आणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 05:13 PM2022-12-13T17:13:08+5:302022-12-13T17:14:06+5:30

Health Tips: पूर्वीच्या तुलनेत आताच्या पिढीचे जीवनमान ढासळत आहे, ते सुधारण्यासाठी हे नियम उपयोगी ठरतील. 

Health Tips: If you want to live longer, implement 'this' remedy immediately after forty! | Health Tips: दीर्घायुष्य मिळावं असे वाटत असेल तर चाळिशीनंतर 'हे' उपाय ताबडतोब अंमलात आणा!

Health Tips: दीर्घायुष्य मिळावं असे वाटत असेल तर चाळिशीनंतर 'हे' उपाय ताबडतोब अंमलात आणा!

Next

'शतायुषी भव' हा आशीर्वाद ऐकायला जितका छान वाटतो, तेवढा तो अंमलात येण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत कठीण वाटतो. कारण आहे आपली ढासळती जीवन शैली! तान्ह्या बाळापासून म्हाताऱ्या आजोबांपर्यंत मोबाईल नामक खेळण्याने सगळ्यांना वेड लावले आहे. त्यामुळे आपण आपली महत्त्वाची कामे, जबाबदाऱ्या विसरत चाललो आहोत. परंतु म्हणतात ना, अति तिथे माती! तशी वेळ येण्याआधी सावध होऊया. निदान वयाच्या चाळीशीनंतर स्वतःवर नियमांची चौकट आखून घेऊया. त्यामुळे केवळ आपली जीवन शैली सुधारेल असे नाही तर आपले आयुर्मानही वाढेल. कसे ते जाणून घ्या-

जेवण निम्मं करा : चाळिशीनंतर आपली पचनसंस्था मंदावते. खाण्याचा उत्साह दांडगा असला तरी पचन क्षमता कमी झाल्याने अन्नाचे रूपांतर ऊर्जेत न होता मेदात होते आणि सुस्तपणा वाढतो. आळस चढतो. त्यामुळे जेवणावर नियंत्रण आणणे महत्त्वाचे ठरते. 

पाणी दुप्पट प्या : वाढत्या वयात पचन क्रियेला वेग देण्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असल्याने वाढत्या वयाच्या दृष्टीने त्याचा शरीराला उपयोग होतो. जेवणाचे प्रमाण कमी करून पाण्याची मात्रा प्रमाणात वाढवली तर भूक नियंत्रणात ठेवता येते. 

परिश्रम तिप्पट करा : वय वाढू लागले की थकवा वाढतो. कारण शरीर अकार्यक्षम होते. ते कार्यन्वित ठेवण्यासाठी परिश्रमाची पातळी वाढवा. भरपूर चाला, जेणेकरून गोळ्या घेऊन झोप येण्याची वाट बघावी लागणार नाही, उलट थकव्याने पाठ टेकवता क्षणीच गाढ झोप लागेल. 

हसणं चौपट करा : दिवसेंदिवस आपण हसणं विसरत चाललो आहोत. मोबाईलमध्ये इमोजी आहेत, विनोदी व्हीडोओ आहेत, परंतु आपण मख्ख चेहऱ्याने ते पाहत असू तर त्याचा आपल्या शरीराला काहीच उपयोग नाही. म्हणून लहान मुलांबरोबर, मित्र मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. हसा, आनंदी राहा. 

नियमित प्राणायाम करा : आपण रोज आपल्याही नकळत श्वसन करतो, मात्र शरीरातील यंत्रणा सुरळीत चालावी यासाठी दीर्घ प्राणायाम गरजेचा आहे. म्हणून प्राणायामाची सवय लावून घेतली पाहिजे. त्यामुळे मन शांत होतं, नैराश्य जातं आणि आयुष्य वाढते. 

साधी जीवनशैली अंगिकारा : आपण म्हणतो ना, प्रवासात सामान जितके कमी तेवढा प्रवास सुखकर, तसाच आपला जीवन प्रवास सोपा करायचा असेल तर अपेक्षांचे ओझे कमी करून साधी जीवन शैली अंगिकारायला हवी. त्यामुळे जीवन सुसह्य होईल आणि आयुर्मान वाढेल. 

कमी प्रक्रिया केलेलं ऍन खाण्यावर भर द्या : कदान्न अर्थात कच्चे अन्न खाणे केव्हाही चांगले. मोड आलेली कडधान्य, उकडलेल्या भाज्या, कंदमुळं पचनास आणि आरोग्यास चांगले. तसेच ताजे, सात्विक अन्नही चांगले. परंतु फार प्रक्रिया केलेले, शिळे अन्न कदापि चांगले नाही. 

आठवड्यातून एक दिवस उपास करा : ज्याप्रमाणे यंत्र सुरळीत चालावे म्हणून आपण एक दिवस त्याला विश्रांती देतो, तशी शरीर यंत्रणा सुरळीत चालावी म्हणून आठवड्यातून एकदा उपास जरूर करावा. 

रागावर नियंत्रण ठेवा : बालपण आणि तारुण्यात आपले रागावर नियंत्रण नसते, मात्र वाढत्या वयानुसार समजूतदारपणा वाढणेही अपेक्षित असते. तसे झाले नाही तर रागावर नियंत्रण राहणार नाही आणि अकारण विविध आजार मागे लागतील. म्हणून जाणीवपूर्वक रागावर नियंत्रण मिळवायला शिका. 

पुरेशी विश्रांती घ्या : जितके काम महत्त्वाचे तेवढाच आरामही महत्त्वाचा! दोन्हीचा योग्य समतोल आखला तरच शरीराला योग्य वंगण मिळेल आणि शरीर कार्यरत राहील. विश्रांतीची वेळ ठरवा आणि तेवढीच विश्रांती घेऊन उत्साहाने कामाला लागा. 

आजूबाजूचे वातारवण प्रसन्न राहील याची काळजी घ्या : आपण स्वयंप्रेरित असलो, तरी सभोवतालच्या परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर परिणाम होत असतो. म्हणून नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न करा. 

ऋतुमानानुसार आहारात बदल करा : आहारात सर्व प्रकारचे पोषक घटक असावेत व त्यात विशेषतः फळांचा समावेश असावा. ऋतुमानानुसार मिळणाऱ्या फळांचा समावेश करावा. ती फळे आपल्या शरीराला मानवतात आणि पोषक ठरतात. 

मनाची मशागत करा : दिवसभरातुन १० मिनिटं तरी स्वतःसाठी काढा. असे म्हणतात की आपण स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी जो वेळ काढतो तो फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे आत्मसंवाद वगळू नका. बहुतांश प्रश्नांची उत्तरे त्यात सामावलेली असतात. त्या चिंतनातून मनाची उत्तम मशागत होते. 

Web Title: Health Tips: If you want to live longer, implement 'this' remedy immediately after forty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.