Health Tips: कायमस्वरूपी स्लिम ट्रिम राहावेसे वाटत असेल तर 'हा' फिटनेस मंत्रा आजपासून सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 10:49 AM2024-06-19T10:49:43+5:302024-06-19T10:50:34+5:30

Health Tips: फिटनेस संदर्भात आपण बरंच काही वाचतो, पाहतो, पण अंमलात आणत नाही; या छोट्या टिप्स मोठे बदल घडवतील हे नक्की!

Health Tips: If you want to stay slim and trim forever, start this fitness mantra today! | Health Tips: कायमस्वरूपी स्लिम ट्रिम राहावेसे वाटत असेल तर 'हा' फिटनेस मंत्रा आजपासून सुरू करा!

Health Tips: कायमस्वरूपी स्लिम ट्रिम राहावेसे वाटत असेल तर 'हा' फिटनेस मंत्रा आजपासून सुरू करा!

सद्यस्थितीत सगळेच जण हेल्थ कॉन्शस झाले आहेत ही आनंदाची बाब आहे. कारण आपल्या देशाला जगात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते. मधुमेहाचे मुख्य कारण आहे लठ्ठपणा! बदलती आहारपद्धती आणि बदलती जीवनशैली पाहता लठ्ठपणा वाढत आहे. तो कमी करण्यासाठी व्यायाम सुरु करू असे म्हणत दिवसामागून दिवस चालले आहेत, पण शुभारंभ होत नाही. ज्यांचा झाला त्यांचे सातत्य टिकत नाही. अशा वेळी आहारा-विहाराबद्दल वैद्यराजांनी दिलेल्या टिप्स आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील आणि छोटा बदल मोठा फरक घडवतील हे नक्की. त्यासाठी सध्या सोशल मीडियावर पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांच्या नावे व्हायरल झालेला संदेश पाहू. यातले अनेक उपाय आपण याआधीही ऐकले असतील. पण म्हणतात ना, सोनाराने कान टोचणे चांगले! त्यानुसार वैद्यराजांनी सांगितलेल्या टिप्स जाणून घेऊ. 

कायम तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ....

1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 9.30 ते 10.00 ला झोपणे.

2. सकाळी 5.00 -5.30 अगदी उशिरा 6 बाजता  किंवा त्याच्या आत उठणे.

3. ब्रश करायच्या आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.

4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे.

5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवारपणे घालणे. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी...5 मिनिटे ओंकार करणे

6. रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस.

7. 8.00-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)

8. 12.30  ते 1.30 ला थोडे हलके जेवण.

9. ऑफिस मध्ये दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.

10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.

11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.

12. 9 ते 9.30  वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 9.30 ते जास्तीत जास्त10.00 ला झोप.

★ खबरदारी घ्या...

रात्रीच्या जेवणानतंर चालायला जाणे टाळावे,  किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....म्हणजे शंभर पावले चालणे....

* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे,  पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास, जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.

* रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.

* फक्त सिजनल फळेच खावीत.

* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि, कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.

* दररोज डाव्याकुशीवर झोपावे.

* सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.

*एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही  वर दिलेले सर्वच्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यांसाठीच आहेत.

 शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त "मांसाहाराने" होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.चहा सोडा B.P.फरक पडेल.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७)  मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे "सडते."

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये, यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९)  केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०)  गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये, डोळे कमजोर होतात.

(११)  स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका. कारण, पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे, नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२)  उभ्याने कधीही पाणी पिऊ नये.. टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये. त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये, नाही तर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत, कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही.

(१६) जेवणा नंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल, तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले,  #बाटलीबंद, फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये# यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०)  गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा, नाही तर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३)  मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते.

(२४)  गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५)  १४ वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नयेत.

 (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण, हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले, तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९)  खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल, तेव्हा दात घासू नये.

(३२)  फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

 किडनी साफ करण्याचा उपाय:

कोथींबीर बारीक, बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका, गॅस बंद करून झाकण ठेवा. (५ मिनीट), नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास. ठीक १५दिवस पीत रहा. लघवीने बारीक-बारीक कण निघता-निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.

Web Title: Health Tips: If you want to stay slim and trim forever, start this fitness mantra today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.