Health Tips : इम्यूनिटी वाढवण्याच्या नादात करू नका ही चूक, होऊ शकतो लिव्हर फेलचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 01:27 PM2022-01-18T13:27:49+5:302022-01-18T13:28:26+5:30
Immunity booster giloy side effect : काही लोक आयुर्वेदिक उपाय करूनही इम्यूनिटी वाढवत आहेत. पण कुणाच्याही सल्ल्याशिवाय, विचार किंवा योग्य माहिती न घेता इम्यूनिटी वाढवण्याचा प्रयत्न करणंही अडचणीत पाडू शकतं.
Immunity booster giloy side effect : वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचं व्हेरिएंट ओमायक्रॉनने लोकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी लोकांचा भर इम्यूनिटी वाढवण्यावर आहे. त्यामुळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने उपाय करत आहेत. काही लोक आयुर्वेदिक उपाय करूनही इम्यूनिटी वाढवत आहेत. पण कुणाच्याही सल्ल्याशिवाय, विचार किंवा योग्य माहिती न घेता इम्यूनिटी वाढवण्याचा प्रयत्न करणंही अडचणीत पाडू शकतं.
इम्यूनिटी बूस्टर आहे गुळवेल
गुळवेलाला आयुर्वेदात फार महत्व आहे. कारण याने पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. इम्यूनिटी वाढवण्यासाठी लोक याचं सेवन करत आहेत. गुळवेल एकप्रकारची जडीबुटी आहे. कोरोना काळात संक्रमणापासून वाचण्यासाठी याचा मोठा वापर झाला आणि मोठ्या प्रमाणात लोक याचं सेवन करू लागले. पण याचं जास्त सेवन केल्याने आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकतं.
लिव्हरवर वाईट प्रभाव
गुळवेल आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे आणि याच्या पानांचा व मुळांचा वापर केला जातो. लोक याच्या मूळांचा आणि पानांचा रस काढून पितात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटीसहीत १३ मेडिकल सेंटर्सच्या रिसर्चमधून चिंताजनक माहिती समोर आली आहे. यात लिव्हर रिसर्च क्लब ऑफ इंडियाला आढळलं की, गुळवेलचा जास्त काळ सेवन करत असलेल्या लोकांमध्ये क्रॉनिक लिव्हर डिजीज किंवा लिव्हर फेलिअरची समस्या होती.
मीडिया रिपोर्टनुसार, केजीएमयूमध्देय गॅस्ट्रोएंटरोलॉजीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. अजय कुमार पटवा म्हणाले की, '६७.४ टक्के रूग्णांमध्ये लिव्हरच्या समस्येचं मुख्य कारण गुळवेल होतं. तर या लोकांमध्ये डायबिटीज, थायरॉइड, हाय ब्लड प्रेशरसारख्या कोणत्याही समस्या नव्हत्या. ते दारूचं सेवनही करत नव्हते'.
अशा बरं होईल की, गुळवेलाचं सेवन करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यासोबतच इम्यूनिटी वाढवणाऱ्या इतर गोष्टींचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. योग्य प्रमाणात करा. नाही तर तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.