तुमची ही सवय ठरू शकते किडनी स्टोनचं कारण, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 12:53 PM2022-12-17T12:53:54+5:302022-12-17T12:55:06+5:30
Kidney Stone Causes: किडनी स्टोन झाल्यावर शरीरात काही लक्षण दिसून येतात. ज्याकडे लोकांनी अजिबात दुर्लक्ष करू नये. चला जाणून घेऊ किडनी स्टोन झाल्यावर काय काळजी घ्यावी?
Kidney Stone Causes: आजकाल लोकांना किडनी स्टोनची समस्या जास्त होत आहे. सगळ्याच वयोगटाला ही समस्या होत आहे. किडनी स्टोनमध्ये सुरूवातीला काहीच लक्षणं दिसत नाहीत, पण थोडे दिवस गेले की, समस्या वाढू लागते. किडनी स्टोनची समस्या झाल्यावर पोटात जोरात वेदना होते. तशी तर किडनी स्टोन होण्याची अनेक कारणे आहेत. जसे की, पाणी कमी पिणे, जंक फूडचं जास्त सेवन करणे किंवा जास्त वजनही याचं मुख्य कारण आहे. अशात किडनी स्टोन झाल्यावर शरीरात काही लक्षण दिसून येतात. ज्याकडे लोकांनी अजिबात दुर्लक्ष करू नये. चला जाणून घेऊ किडनी स्टोन झाल्यावर काय काळजी घ्यावी?
किडनी स्टोनची कारणं आणि बचावाचे उपाय
किडनी स्टोन होण्याला अनेक कारणे आहेत. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये किडनी स्टोनची समस्या जास्त बघायला मिळते. अशात जर तुम्हालाही किडनी स्टोनची समस्या असेल तर बाहेरचं खाणं, जास्त साखर, मीठ आणि प्रोटीन असलेले पदार्थ खाणं टाळा. तेच किडनी स्टोनने पीडित लोकांनी आपल्या डाएटवर खास लक्ष द्यावं. सोबतच एक्सरसाइज आणि योगाही करावा.
या गोष्टींमुळे वाढू शकते समस्या
बीफ, चिकन, अंडी, दूध, चीज, दही, पालक इत्यादीमुळे लघवीमध्ये यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्हाला जर किडनी स्टोनची समस्या असेल तर हे पदार्थ टाळावे. त्याशिवाय डॉक्टरांना संपर्क करा.
किडनी स्टोनपासून कसा कराल बचाव
किडनी स्टोनच्या समस्येपासून बचाव करायचा असेल तर शरीरात पाण्याची कमतरता नसावी. त्यासाठी दिवसातून कमीत कमी 8 ग्लास पाणी प्यावे. पाण्यासोबतच फळांचा ज्यूसही डाएटमध्ये सामिल करा.