किडनीसंबंधी समस्या असेल तर फॉलो करा या टिप्स, नेहमीच रहाल निरोगी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 01:36 PM2023-02-27T13:36:53+5:302023-02-27T13:37:32+5:30
How To Keep Your Kidneys Healthy: याचं कारण म्हणजे शरीरात जेवण केल्यानंतर अनेक विषारी पदार्थ तयार होत असतात जे लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतात. अशात किडनीला हेल्दी ठेवणं फार गरजेचं आहे.
How To Keep Your Kidneys Healthy: किडनी आपल्या शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनी आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करते. जर किडन्यांनी काम करणं बंद केलं तर व्यक्ती जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही.
याचं कारण म्हणजे शरीरात जेवण केल्यानंतर अनेक विषारी पदार्थ तयार होत असतात जे लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतात. अशात किडनीला हेल्दी ठेवणं फार गरजेचं आहे. कारण किडनीमध्ये काही समस्या झाली तर शरीरात गडबड होते. अशात जर तुम्हाला किडनीसंबंधी काही समस्या असेल तर काही उपाय आम्ही सांगत आहोत. किडनी हेल्दी ठेवण्यासाठी काय करावं हे आम्ही तुम्हाला सांगतो.
हेल्दी डाएट
किडनी हेल्दी ठेवण्यासाठी हेल्दी डाएट घेतली पाहिजे. यासाठी ताजी फळं, हिरव्या भाज्या खाव्यात. त्याशिवाय फ्लॉवर, फुलकोबी, पालक, बीट, सफरदंच, संत्री, द्राक्ष यांचा आहारात समावेश करावा. यांचं सेवन केल्याने किडनीची सफाई होते.
ब्लड शुगर कंट्रोल
किडनी शरीरातील विषारी पदार्थ वेगळे करून बाहेर काढण्याचं काम करतात. जर रक्तात ब्लड शुगरचं प्रमाण जास्त असेल तर याचा प्रभाव किडनीवर पडतो. त्यामुळे कोणत्याही स्थितीत ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर तुम्हाला आरोग्यानुसार लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागेल.
वजन कमी करा
जर तुमचं वजन जास्त असेल तर याचा तुमच्या किडनीवर खूप प्रभाव पडतो. जर तुम्हाला वाटतं की, किडनी हेल्दी राहत असेल तर वजन कमी करा. कारण जास्त वजन असेल तर किडनीचं आरोग्य बिघडू शकतं.