तुमच्या रोजच्या 'या' सवयी तुम्हाला पडू शकतात महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 11:53 AM2018-07-20T11:53:23+5:302018-07-20T11:53:32+5:30
गोष्टी छोट्या छोट्या आणि आपल्या सवयीतल्या असल्याने याकडे आपण फार लक्ष देत नाही. पण याच तुम्ही करत असलेल्या गोष्टींमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया काय आहेत या गोष्टी....
आपण आपल्या रोजच्या जगण्यात अशा काही गोष्टी करत असतो ज्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येतं. या गोष्टी छोट्या छोट्या आणि आपल्या सवयीतल्या असल्याने याकडे आपण फार लक्ष देत नाही. पण याच तुम्ही करत असलेल्या गोष्टींमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया काय आहेत या गोष्टी....
ऑफिसच्या डेस्कवर जेवण करणे
काही लोक हे आपल्या डेस्कवर बसूनच जेवण करतात. पण हे आरोग्यासाठी चांगलं नाहीये. एका अभ्यासानुसार, लॅपटॉप असो वा डेस्कटॉप दोन्हींच्या किबोर्डमध्ये हानिकारक किटाणू असतात. ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो. या अभ्यासात हेही सांगण्यात आले आहे की, टॉयलेट सीटपेक्षाही जास्त किटाणू किबोर्डमध्ये असतात.
तासंतास टीव्ही बघणे
काही लोकांना तासंतास टीव्ही बघण्याची सवय असते. पण फार जास्तवेळ टीव्ही बघणे हानिकारक आहे. एका अभ्यासानुसार, रोज १ तास टीव्ही बघितल्याने आयुष्यातील २२ मिनिटे कमी होतात. टीव्ही बघण्याचा सर्वात वाईट परिणाम म्हणेज तुम्ही फार आळशी होता. तुम्ही वर्कआऊटपासून दूर राहू लागतात. ही सवय लवकरात लवकर बंद करा.
नाकातील केस सतत काढणे
सुंदर दिसण्याच्या नादात लोक नाकातील केस काढतात हे फार धोकादायक ठरू शकतं. एक्सपर्टनुसार, नाकातील केस हे शरीरात धुळ, घाण जाण्यापासून रोखतात. जर हेच केस नसले तर फुफ्फूसांचे वेगवेगळे आजार होतात. नाकात कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन सहज होतं. कधी कधी हे इन्फेक्शन मेंदुसाठीही धोकादायक ठरतं.
पिन किंवा टूथपिकने दात साफ करणे
दातांसोबत केलेलं हे काम फारच धोकादायक ठरू शकतं. आपण अनेकदा याकडे लक्ष देत नाही आणि यामुळे इन्फेक्शनचा सामना करावा लागतो. पिनने किंवा टूथपिकने दात साफ केल्यास हिरड्यांना इजा होऊ शकते. यामुळे दात कमजोर होऊ शकतात.
प्रमाणापेक्षा जास्त खाणे
खाण्याच्या सवयीवर काही लोकांचा कंट्रोल नसतो. त्यामुळे ते खूप जास्त खातात. पण जास्त खाल्याने अनेक प्रकारचे विकार होऊ शकतात.