'या' कारणामुळे तुमच्याही शरीरात उद्भवू शकते ऑक्सिजनची कमतरता; वेळीच जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 06:22 PM2020-09-16T18:22:06+5:302020-09-16T18:28:48+5:30

ऑक्सिजनची क्षमता कमी झाल्यास रोगप्रतिकारकशक्तीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

Health Tips : low oxygen level in human body symptoms and causes health issues | 'या' कारणामुळे तुमच्याही शरीरात उद्भवू शकते ऑक्सिजनची कमतरता; वेळीच जाणून घ्या उपाय

'या' कारणामुळे तुमच्याही शरीरात उद्भवू शकते ऑक्सिजनची कमतरता; वेळीच जाणून घ्या उपाय

googlenewsNext

शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ऑक्सिजनची क्षमता कमी झाल्यास रोगप्रतिकारकशक्तीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत कोणतेही व्हायरस बॅक्टेरिया शरीरावर लवकर आक्रमण करतात. आज आम्ही तुम्हाला शरीरातील ऑक्सिजनची कमतरता कमी असल्यास कोणत्या  गंभीर आजारांचा धोका असतो याबाबत सांगणार आहोत. शरीरात ऑक्सिजनची कमतरता असण्याची अनेक कारणं असू शकतात. आपल्या जीवनशैलीवर आरोग्याचं संतुलन अवलंबून असतं.  शारीरिकदृष्या एक्टिव्ह असल्यास शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. 

शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्याची कारणं

जे लोक शारीरिक  श्रमाचं काम करतात किंवा व्यायाम करतात योग्य पद्धतीने डाएट फोलोव्ह करतातत त्याच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. ज्या लोकांच्या आहारात आयरनचं प्रमाण कमी असतं. त्यांनाही हा त्रास उद्भवतो. कारण फुफ्फुसांसह शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी आयर्नची भूमिका महत्वाची असते. 

अनेकजण शारीरिक श्रमाचं काम करतात. त्या तुलनेत आहार व्यवस्थित घेत नाहीत. परिणामी शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासते. शरीरात आयर्नची  कमतरता असल्यासही ऑक्सिजन लेव्हल कमी  होते. कारण फुफ्फुसांपर्यंत हवा पोहोचवण्यासाठी आयर्नची भूमिका महत्वाची असते.

शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्याचे अनेक कारणं  असू शकतात. जीवनशैलीशी निगडीत घटकांचा परिणाम शरीरावर होत असतो. जे लोक जास्तीत जास्त वेळ एकाच जागी बसून असतात त्यांना ही समस्या उद्भवू शकते.  शारीरिक हालचाली न केल्यासं शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासते. 

उपाय

व्यायाम केल्यानं किंवा योगा केल्यानं शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. हृदय चांगले राहते. यासोबतच चांगला आहार घेतल्यास फुफ्फुस चांगली राहतात. शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून निघते. डाळी, ताज्या भाज्या, अंडी, दूध, पनीर,  व्हिटामीन्स युक्त फळं, भाकरी यांचा आहारात समावेश करायला हवा.

ब्रिदिंग या व्यायाम प्रकारात तुम्हाला श्वसन यंत्रणेवर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये रक्त पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल. सगळ्यात आधी ४ सेकंदापर्यंत श्वास रोखून धरा. जेणेकरून फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचेल. मग ४ सेकंदांनी श्वास सोडून द्या. त्यामुळे  शरीराला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो.

रोज ७ ते ८ तास झोपल्यानं निरोगी राहण्यास मदत होते.  कारण  तुम्ही दिवसभरात वेगवेगळी कामं करत असता. अनेकदा औषधांचे सेवन केलं जातं. अशावेळी पुरेशी झोप झाली नाही तर शारीरिक स्थिती खराब होण्याची शक्यता असते. जर पूर्ण झोप झाली तर उत्साह वाढण्यास मदत होईल. 

दुष्परिणाम 

शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळे ब्रेन डॅमेज किंवा हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. 
डायबिटिसच्या रुग्णांसाठी शरीरात ऑक्सिजनची कमतरता असणं धोकादायक ठरू शकतं. कारण त्यामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर परिणाम होतो. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं नुकसानकारक ठरू शकतं. 
थायरॅाइडच्या  रुग्णांसाठीही ऑक्सजन कमी होण्यानं समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानंतर थायरॉईडचा स्तर वाढू शकतो किंवा कमी होण्याचा धोका असतो. 
यावर उपाय म्हणून व्यायाम करणं, योगा  करणं,  संतुलित आहार घेणं, शरीरात व्हिटामीन्सची कमतरता भासू न देणं फायद्याचं ठरेल. 

हे पण वाचा-

काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध

अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

Web Title: Health Tips : low oxygen level in human body symptoms and causes health issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.