वाढत्या कोरोनाच्या प्रसारात फुफ्फुसांना चांगलं ठेवायचंय? तर आजपासूनच 'या' टिप्स वापरून तब्येत सांभाळा
By manali.bagul | Published: December 30, 2020 05:05 PM2020-12-30T17:05:08+5:302020-12-30T17:12:06+5:30
Health Tips in Marathi : फुफ्फुसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे, कोणते पदार्थ आहारातून वगळायला हवेत. याबाबत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
श्वास घेण्याची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी फुफ्फुसांचे कार्य व्यवस्थित होणं गरजेचं आहे. फुफ्फुसं शरीरातील एक महत्वपूर्ण अवयवय आहे. कोरोनाची माहामारी आणि वाढणारी प्रदूषित हवा यामुळे फुफ्फुसं कमजोर होत आहेत. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होण्याची कॉमन समस्या अनेकांमध्ये जाणवत आहे. फुफ्फुसांना चांगले ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. फुफ्फुसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे, कोणते पदार्थ आहारातून वगळायला हवेत. याबाबत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
अल्कोहोल
मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. जास्त मद्यपान केल्याने फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते. अल्कोहोलमध्ये उपस्थित सल्फेट्समुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. तर इथेनॉल आपल्या फुफ्फुसांच्या पेशींवर परिणाम करते. जास्त मद्यपान केल्यामुळे न्यूमोनिया आणि फुफ्फुसांच्या इतर समस्या उद्भवू शकतात.
मीठ
मीठ आरोग्यासाठी आवश्यक आहे परंतु मर्यादित प्रमाणात. जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यास फुफ्फुसांच्या समस्या वाढू शकतात. म्हणूनच, फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी मीठ कमी वापरा.
सॉफ्ट ड्रिक्स
प्रत्येकाला सॉफ्ट ड्रिक्स पिणे आवडते, परंतु सॉफ्ट ड्रिंकचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी आणि फुफ्फुसांना हानिकारक ठरू शकते. जे लोक मद्यपान करतात त्यांना फुफ्फुसांचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. न्यू ईअर , ख्रिसमस अशा सणांच्यावेळी खासकरून जास्तीत जास्त लोक सॉफ्ट ड्रिक्सचे सेवन करतात. जर तुम्ही कमी प्रमाणात, कधीतरी अशा ड्रिंक्सचे सेवन करत असाल तर काळजींच काही कारण नाही. पण जर रोज सॉफ्ट डिंक्सचं सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती
तळलेले पदार्थ
आपल्याला तळलेले पदा्रर्थ खूप आवडतात.पण जर आपल्याला फुफ्फुसांना निरोगी ठेवायचे असेल तर आपण या पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. तळलेले तळलेले पदार्थ फुफ्फुसांना हानिकारक ठरू शकतात.
Coronavirus: भारतात कोरोनाचा आणखी एक गंभीर साइड इफेक्ट आला समोर, डॉक्टरांनी दिला इशारा....
प्रोसेस्ड मीट
प्रक्रिया केलेले मांस टिकवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्या नायट्रिट्समुळे फुफ्फुसात जळजळ आणि तणाव निर्माण होतो. प्रक्रिया केलेले मांस फुफ्फुसांना हानिकारक ठरू शकते.