लिव्हरवर सूज आणतात या 2 चुकीच्या सवयी, सोडल्या नाही तर कधीच पचणार नाही अन्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 01:12 PM2023-07-27T13:12:17+5:302023-07-27T13:13:02+5:30
Fatty Liver : जास्तीत जास्त केसेसमध्ये फॅटी लिव्हर रोग कोणतीही गंभीर समस्या निर्माण करत नाही. पण याने लिव्हरचं काम प्रभावित होतं. यामुळे लिव्हरवर सूज येते, यामुळे त्याचे टिश्यू डॅमेज होतात.
Fatty Liver : फॅटी लिव्हर ही एक गंभीर समस्या आहे. ज्याला मेडिकल भाषेत हेपेटिक स्टीटोसिस (Hepatic Steatosis) असं म्हटलं जातं. या आजारामुळे लिव्हरच्या कोशिकांममध्ये फॅट जमा होतं. ज्यामुळे लिव्हरवर सूज येतो. गेल्या काही वर्षात फॅटी लिव्हरच्या समस्या खूप वाढल्या आहेत. लिव्हरमध्ये काही प्रमाणात फॅट असतंच पण जेव्हा ते लिव्हरच्या वजनापेक्षा 5 ते 10 टक्क्यांपर्यंत पोहोचतं तेव्हा ही समस्या होते.
जास्तीत जास्त केसेसमध्ये फॅटी लिव्हर रोग कोणतीही गंभीर समस्या निर्माण करत नाही. पण याने लिव्हरचं काम प्रभावित होतं. यामुळे लिव्हरवर सूज येते, यामुळे त्याचे टिश्यू डॅमेज होतात. फॅटी लिव्हर हा आजार दोन प्रकारचा असतो एका आहे अल्कोहल-फॅटी लिव्हर डिजीज जी मद्यसेवन अधिक केल्याने होते आणि दुसरा प्रकार आहे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज. ही समस्या लठ्ठपणा किंवा डायबिटीस या कारणांमुळे होते. चला जाणून घेऊ मद्यसेवनाशिवाय ही समस्या कोणत्या कारणांनी वाढते.
अनहेल्दी डाएट
NCBI वर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, अनहेल्दी फॅट, शुगर आणि प्रोसेस्ड फूडचं अधिक सेवन केल्याने तुम्हाला हा आजार होऊ शकतो. जास्त कॅलरींचं सेवन आणि आवश्यक पोषक तत्वांची कमतरता यामुळे लिव्हरच्या पचनाच्या क्षमतेवर वाईट प्रभाव पडतो. ज्यामुळे लिव्हरच्या कोशिकांमध्ये फॅट जमा होतं.
इन्सुलिन रेसिस्टेंट आणि डायबिटीस
इन्सुलिन रेसिस्टेंट एक अशी स्थिती आहे ज्यात शरीराच्या कोशिका इन्सलिनबाबत कमी प्रतिक्रिया देतात. इन्सुलिन एक हार्मोन आहे जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतं. याने लठ्ठपणा वाढण्याचा आणि टाइप 2 डायबिटीस होण्याचा धोका असतो.
मद्याचं अधिक सेवन
क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, मद्याचं अधिक सेवन फॅटी लिव्हरचं एक मोठं कारण असतं. याने अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. इतकंच काय तर मद्यसेवन कमी केलं तर लिव्हरला समस्या होऊ शकते.
मेटाबॉलिक सिंड्रोम
मेटाबॉलिक सिंड्रोम अनेक आजारांचा एक ग्रुप आहे ज्यात लठ्ठपणा, हाय बीपी, हाय ब्लड शुगर आणि अबनॉर्मल लिपिड प्रोफाइल यांचा समावेश आहे. याने रूग्णाच्या लिव्हरच्या कामावर परिणाम होतो.
फॅटी लिव्हरची डिजीजची इतर कारणे
फॅटी लिव्हर डिजीजच्या इतर कारणांमध्ये तुमचं वजन वेगाने कमी होणं, काही औषधं, वायरल हेपेटायटिस आणि जेनेटिक यांचा समावेश आहे.