'ही' लक्षणं असतील तर तुम्हालाही असू शकतो थायरॉईड; वेळीच जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

By Manali.bagul | Published: October 5, 2020 07:24 PM2020-10-05T19:24:23+5:302020-10-05T19:35:52+5:30

Symptoms of hypothyroidism Marathथायरॉईड ग्रंथी घश्यात असतात. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेकदा मेटाबॉलिझम स्लो होते. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईड कॅन्सरचाही धोका जास्त असतो.

Health Tips Marathi: 7 signs and symptoms of hypothyroidism in men by experts | 'ही' लक्षणं असतील तर तुम्हालाही असू शकतो थायरॉईड; वेळीच जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

'ही' लक्षणं असतील तर तुम्हालाही असू शकतो थायरॉईड; वेळीच जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

googlenewsNext

सध्याच्या जीवनशैलीत थायरॉईड एक साधारण समस्या बनली आहे. जवळपास  १२ टक्के लोकांना रोजच्या जीवनात  थायरॉईडचा सामना करावा लागतो. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईड  उद्भवण्याचा धोका ८ टक्क्यांनी जास्त असतो. याशिवाय वाढत्या वयात प्रत्येकावर वेगवेगळ्या पद्धतीने थायरॉईडचा प्रभाव पडतो. हा हार्मोन शरीरातील उर्जा, विकास आणि चयापचन यांच्या समन्वयासाठी जबाबदार असतो.  या हामोन्सचा स्तर कमी जास्त झाल्यास शारीरिक समस्या उद्भवतात. थायरॉईड ग्रंथी घश्यात असतात. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेकदा मेटाबॉलिझम स्लो होते. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईड कॅन्सरचाही धोका जास्त असतो.

या हार्मोनचा पुरूषांवर कसा प्रभावा पडतो

ओन्ली माय हेल्थशी बोलताना डॉ. सतीश कौल यांनी  सांगितले की, महिलाच्या तुलनेत पुरूषांमध्ये या आजाराचं प्रमाण कमी दिसून येतं. ९ महिलांमागे एका पुरूषामध्ये ही समस्या दिसून येते. हात पाय सुन्न होणं, थकवा येणं, लैगिंक जीवनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. हायपोथायरॉईडीज्म अनुवाशिकतेंमुळेही होऊ शकतो. वयाच्या ३० व्या वर्षानंतर महिलांमध्ये ही समस्या उद्भवते. 

लक्षणं

एकाग्रता कमी होणं

थंडीच्या वातावरणातही घाम येणं

वेगानं वजन कमी होणं

सतत थकवा येणं

अनिद्रा व अनावश्यक थकवा

केसगळणं

कोलेस्ट्रोल कमी होणं

स्मरणशक्ती कमी होणं

उपाय 

तुम्हालाही अशी लक्षणं  दिसत असतील तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. वेळेवर योग्य उपचार घेतल्यास कोणताही आजाराला वाढण्यापासून रोखता येऊ शकतं. साखरेचं कमी प्रमाणात सेवन करा. शरीरात साखरेचं प्रमाण वाढवणार्‍या इतर पदार्थांचं प्रमाणही कमी करा.

आहारात प्रोटिनचं प्रमाण वाढवा. शरीरात प्रोटिन्स थायरॉईड हार्मोन्सला टिश्यूजपर्यंत पोहचवतात. खाण्यात प्रोटिनचं प्रमाण वाढवल्यानं थायरॉईडची समस्या कमी होऊ शकते. अनेकदा या आजारात वजन वाढतं. तेव्हा महिला फॅटयुक्त आहार घेणं सोडून देतात. यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडलं जातं. अशा वेळी शरीराची गरज पूर्ण करणारे फॅट घेणे गरजेचे असते. हे फॅट हेल्दी असतील याची काळजी घ्या. सतत मास्कच्या वापरानं शरीरात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं?, तज्ज्ञ सांगतात की....

मादक पदार्थांचे सेवन करू नका. आर्यन असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.या आजारात महिलांमध्ये विशेषतः आयर्नची कमतरता भासते. अशा वेळी त्यांना आयर्नसोबतच इतर पोषक पदार्थही मोठ्या प्रमाणात घ्यायला हवेत. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या. पुढच्यावर्षी जुलैनंतर 5 पैकी एका व्यक्तीला मिळणार कोरोनाची लस; जाणून घ्या सरकारचा 'हा' प्लॅन

Web Title: Health Tips Marathi: 7 signs and symptoms of hypothyroidism in men by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.