तुम्हीसुद्धा रोज शरीराला घातक ठरणाऱ्या भाज्या खाताय? रिपोर्टमधून समोर आली धक्कदायक बाब

By Manali.bagul | Published: October 13, 2020 08:04 PM2020-10-13T20:04:58+5:302020-10-13T20:08:26+5:30

Health Tips : भाज्या आणि फळांमधून शरीराला पोषण मिळतं. पण अनेक भागात विषारी आणि शरीरासाठी घातक असलेल्या भाज्या विकल्या जातात. सतत अशा प्रकारच्या भाज्याचे सेवन केल्याने आरोग्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते. 

Health Tips Marathi : Adulterated harmful vegetables are sold across india says report | तुम्हीसुद्धा रोज शरीराला घातक ठरणाऱ्या भाज्या खाताय? रिपोर्टमधून समोर आली धक्कदायक बाब

तुम्हीसुद्धा रोज शरीराला घातक ठरणाऱ्या भाज्या खाताय? रिपोर्टमधून समोर आली धक्कदायक बाब

googlenewsNext

कोणत्याही आजारापासून लांब राहण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं आवश्यक असतं. त्यासाठी नेहमी पोषण देत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. सध्या कोरोनाची माहामारी असल्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष  देणं गरजेचं आहे. कारण रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास कोरोना आणि कोरोनसारख्या  इतर साथीच्या आजारांपासून बचाव करणं कठीण होऊ शकतं. भाज्या आणि फळांमधून शरीराला पोषण मिळतं. पण अनेक भागात विषारी आणि शरीरासाठी घातक असलेल्या भाज्या विकल्या जातात. सतत अशा प्रकारच्या भाज्याचे सेवन केल्याने आरोग्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते. 

काही भाज्यांमध्ये शिसं आणि कॅडमियमसारखे घातक धातू असल्याचं दिसून आलं आहे. जवळपास 9.5 टक्के भाजा या खाण्यायोग्य नसल्याचं देखील दिसून आलं आहे. भारतीय अन्न सुरक्षा मानक आणि प्राधिकरणाच्या एक अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासासाठी विविध राज्यांमधील नमुने यासाठी घेण्यात आले होते. यामध्ये १० टक्के भाज्या या खाण्यायोग्य नव्हत्या. यात मध्य प्रदेशातील सर्वांत जास्त नमुने खाण्यायोग्य नसल्याचं समोर आलं.

जवळपास 25 टक्के भाज्या या खाण्यायोग्य नव्हत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगढ असून तेथील 13 टक्के भाज्या खाण्यायोग्य नव्हत्या. त्यानंतर बिहार, चंदीगड, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड, पंजाब आणि दिल्लीचा क्रमांक आहे.  डीएनएने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील टोमॅटोच्या नमुन्यांमध्ये जवळपास 600 मायक्रोग्राम इतकं शिसं आढळून आलं होतं. इतकंच नाही तर देशभरातील भाज्यांमध्ये कॅडमिअम, अर्सेनिक आणि मर्क्युरीसारखे घातक धातूदेखील आढळून आले होते.  WHO प्रमुखांनी दिल्या कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स, 'या' कारणामुळे भारताचं केलं कौतुक

FSSAIने या परिक्षणासासठी फळभाज्यसह पालेभाज्या आणि कंदमुळांचीही तपासणी केली होती. यात दिसून आलं की, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे भाज्या शरीरासाठी घातक ठरत असल्याचे  FSSAI ला आपल्या निरीक्षणात दिसून आलं आहे. यावर उपाय म्हणून भाज्या शिजवण्याआधी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. बाजारातून भाजी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या. भाज्या उकळून आणि उकडून घ्याव्यात. मिठाच्या पाण्यातदेखील भाज्या काही वेळ ठेवल्यास त्या प्रदूषणापासून मुक्त होतात. सध्या कोरोनाची भीती असल्यामुळे सगळेचजण भाज्या धुवून स्वच्छ करून घेतात. ही सवय नेहमीच ठेवली तर आजारांपासून बचाव होऊ शकतो. हर्ड इम्यूनिटीबाबत WHO ने दिली धोक्याची सुचना, कोरोनाबाबत गैरसमज ठेवल्यास पडेल महागात

Web Title: Health Tips Marathi : Adulterated harmful vegetables are sold across india says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.