Breast cancer in men : पुरूषांमध्येही वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; शरीरात असे बदल दिसले तर वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांचा दावा
By Manali.bagul | Published: February 25, 2021 12:14 PM2021-02-25T12:14:02+5:302021-02-25T12:26:22+5:30
Health Tips in Marathi :साधारणपणे ट्यूमरसारखा आकार तयार होतो. या गाठीला एक्स रे च्या माध्यमातून पाहता येऊ शकतं.
आतापर्यंत तुम्ही महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल ऐकलं असेल, पण तुम्हाला कल्पना आहे का? पुरूषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी खरं आहे.पुरूषांच्या शरीरात कॅन्सरच्या पेशींचा विकास होतो. याला मेल ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणतात. जेव्हा हा कॅन्सर होतो तेव्हा छातीच्या पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात. साधारणपणे ट्यूमरसारखा आकार तयार होतो. या गाठीला एक्स रे च्या माध्यमातून पाहता येऊ शकतं.
मॅक्स सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयातील डॉ. मीनू वालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त महिलांना कॅन्सरचा सामना करावा लागतो. पण पुरूषांनाही अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार ब्रेस्ट कॅन्सरची सुरूवात छातीच्या कोणत्याही भागापासून होऊ शकते.
हा कॅन्सर डक्ट्सपासून सुरू होऊन निप्पलपर्यंत पोहोचतो. काहीवेळा ग्रंथींमध्ये सुरू होतो त्यामुळे गाठीसारखा भाग त्वचेवर तयार होतो. म्हणून ब्रेस्ट कॅन्सरची काही लक्षणं दिसून आल्यास डॉक्टरांची संवाद साधणं गरजेचं आहे. जेवढा उपचारासाठी उशीर हईल तेवढा त्रास वाढतो आणि तो हाताबाहेर जाण्याचा धोका असतो.
पुरूषांमधील ब्रेस्ट कॅन्सरची कारणं
डॉक्टर मीनू वालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुवांशिकतेमुळे, अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे, शारीरिक हालचाल कमी केल्यानं, हार्मोनल रिप्लेसमेंट थेरेपी यांमुळे पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो.
लक्षणं
छातीचा आकार वाढणं
त्वचेच्या रंगात बदल होणं
अल्सर किंवा रक्तस्त्राव होणं
निप्पलमधून स्त्राव होणं
या आजारापासून बचाव होण्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट करायला हवी. ३५ वर्षानंतर प्रत्येक पुरूषानं आपली स्क्रिनिंग टेस्ट करायला हवी. पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता महिलांच्या तुलनेत उतार वयात वाढते. पुरुषांमध्ये ब्रेस्ट ट्युमर तपासणं अधिक सोपं असतं.`गिनेकोमास्टिआ`मुळं ब्रेस्ट ट्युमर वाढतो. पुरुषांना `इस्ट्रोजेन पॉझिटिव्ह ट्युमर`जास्त होऊ शकतो. त्यामुळे अशा पेशंटवर टॅमोत्सिफेन उपचार करणं शक्य असतं. महिला आणि पुरुषांमध्ये`सर्व्हाइव्हल रेट` मात्र सारखाच असतो.
फरिदाबादच्या एशियन हॉस्पिटलचे सर्जिकल ऑनकोलॉजीचे डायरेक्टर डॉ. अमीश चौधरी यांनी सांगितले की, जन्मापासूनच प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ब्रेस्ट टिश्यूज असतात. ब्रेस्ट टिश्यू हे दूध तयार करत असलेल्या डक्ट पासून तयार होतात. फक्त पुरूषांमध्ये दूध तयार करत असलेले हॉर्मोन्स नसतात. महिलांमध्ये तरूण वयात हे टिश्यूज वाढू लागतात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
कारणं
वाढत्या वयात ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका पुरुषांमध्ये वाढतो. जसजसे वय वाढते, तसतसे त्याचे जोखीम देखील वाढते, परंतु याचा अर्थ असा होत नाही की हे केवळ वृद्धांना होते. पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर कोणत्याही वयात उद्भवू शकतो.
लठ्ठपणा आपल्याबरोबर बर्याच रोगांना घेऊन येतो. त्यापैकी एक पुरुषांचा ब्रेस्ट कॅन्सर देखील आहे. आपण आपल्या उंचीनुसार आपले वजन व्यवस्थापित केले पाहिजे. निरोगी आहार घेणे आणि नियमितपणे शारीरिक क्रिया करणे हे खूप महत्वाचे आहे. पाठ आणि कंबरदुखीचे कारण ठरू शकतात रोजच्या चुकीच्या सवयी; पाठीच्या कण्याचं होतय नुकसान
या प्रकारच्या कॅन्सरमध्ये कौटुंबिक इतिहास महत्वाची भूमिका बजावते. बर्याच वेळा असे घडते की आपल्या कुटुंबातील कोणीतरी ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त झाले आहे. अशा परिस्थितीत आपल्याला मेल ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे.
पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे एक कारण धूम्रपान आणि मद्यपान हे आहे. यामुळे फुफ्फुसांमध्येही समस्या निर्माण होते. हे पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगाचे एक कारण देखील असू शकते.