आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:43 PM2020-09-17T12:43:46+5:302020-09-17T12:55:29+5:30

फक्त चवीसाठी नाही तर चांगल्या आरोग्यासाठीही दुधीच्या भाजीचं सेवन करणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया दुधीच्या सालीच्या सेवनानं शरीराला कोणते फायदे मिळतात आणि त्याचा वापर कसा करायचा. 

Health Tips in Marathi : Health benefits of gourd peel | आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल

आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल

googlenewsNext

बाजारात दुधीची भाजी सहज कोणत्याही ऋतू उपलब्ध होते. आतापर्यंत तुम्ही दुधीचा वापर हलवा तयार करण्यासाठी, भाजी बनवण्यासाठी, कोंशिंबीरीसाठी करत असाल. पण तुम्हाला माहित आहे का, दुधीच्या सालीचा वापर करून तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता. फक्त चवीसाठी नाही तर चांगल्या आरोग्यासाठीही दुधीच्या भाजीचं सेवन करणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया दुधीच्या सालीच्या सेवनानं शरीराला कोणते फायदे मिळतात आणि त्याचा वापर कसा करायचा. 

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी 

दुधी शरीरासाठी थंड असते. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा कोणत्याही ऋतूत शरीराचं तापमान वाढल्यास पायांच्या  तळव्यांमध्ये जळजळ होण्याची समस्या उद्भवते. अशावेळी जर तुम्ही दूधीची सालं पायाच्या तळव्यांना घासलीत तर आराम मिळेल.  त्वचेवर जळजळ होत असल्यास दुधीची साल लावल्यास आराम मिळतो. 

टॅनिंग निघून  जाते

उन्हात गेल्यानंतर त्वचेवर सनबर्न, टॅनिंगची समस्या उद्भवते. जर तुम्ही दुधीच्या सालीची पेस्ट तयार करून तोंडाला लावाल तर या समस्येपासून आराम मिळेल. दुधीच्या सालीची पेस्ट करून त्वेचवर लावा. हा पॅक सुकल्यानंतर तोंड स्वच्छ धुवून टाका. घरच्याघरी हा उपाय केल्यास त्वचेवर ग्लो येईल. याशिवाय काळपटपणा निघून जाण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी

सध्याची जीवनशैली आणि लॉकडाऊन यामुळे अनेकांना वजन वाढण्याची समस्या उद्भवली आहे.  रोज दुधीचा रस पिऊन तुम्ही वाढलेलं वजन कमी करू शकता. याशिवाय त्वचेवर ग्लोही येतो. तुम्ही जर दूधीची भाजी खात नसाल तर रस प्यायल्यानंही फायदा होईल. 

मुधव्याधाच्या समस्येपासून आराम

अनियिमित  जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यांमुळे अनेकदा आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला मुळव्याधाची समस्या उद्भवत असेल तर दुधीचं साल सुकवून त्यांची  पावडर तयार करून पाण्यासोबत  घ्या. हा उपाय केल्यास मुधव्याधाच्या त्रासापासून आराम मिळेल. 

पोटाच्या समस्यांनी हैराण असाल तर नाश्त्यामध्ये खा दूधी भोपळ्याचे पोहे

दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण फार जास्त असतं. तसेच दुधी भोपळ्यामध्ये फायबरही मुबलक प्रमाणात असतं. यामुळे पोटाच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि बद्धकोष्टाची समस्या असणाऱ्यांसाठी दुधी भोपळा एक हेल्दी पदार्थ ठरतो. आज अशीच एक दुधी भोपळ्यापासून तयार करण्यात आलेली हेल्दी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचं नाव आहे 'दुधी भोपळ्याचे पोहे'.

पोहे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य : 

अर्धा कप दुधी भोपळा 

एक कप पोहे 

100 ग्रॅम शेंगदाणे 

एक चमचा जीरं 

चिमुटभर काळी मिरी पावडर 

2 हिरव्या मिरच्या 

एक चमचा गुळाची पावडर 

मीठ 

दुधी भोपळ्याचे पोहे तयार करण्याची पद्धत : 

- दुधी भोपळ्याची साल काढून तो किसून घ्या. पोहे पाण्याने धुवून त्यातील पाणी काढून बाजूला ठेवा. 

- एका कढईमध्ये तूप गरम करा. त्यानंतर कापलेली हिरवी मिरची आणि जिऱ्याची फोडणी द्या.

- फोडणी दिल्यानंतर किसलेला दुधी भोपळा त्यामध्ये टाकून एकत्र करा. 3 ते 4 मिनिटांपर्यंत परतून घ्या. 

- आता शेंगदाणे भाजून ते थोडे जाडसर बारिक करा आणि मिश्रणामध्ये एकत्र करा. 

- थोड्या वेळानंतर पोहे त्यामध्ये एकत्र करा आणि मंद आचेवर शिजवून घ्या. 

- आता त्यामध्ये मीठ, काळी मिरी आणि गुळाची पावडर किंवा गूळ एकत्र करा. 

- पोहे तयार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबरं, हिरवी कोथिंबीर आणि लिंबू एकत्र करू शकता. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

हे पण वाचा-

काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध

अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

Web Title: Health Tips in Marathi : Health benefits of gourd peel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.