पावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूत 'हे' सोपे उपाय वापरून सर्दी, खोकल्याला ठेवा दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 04:40 PM2020-08-07T16:40:53+5:302020-08-07T16:41:40+5:30
अनेकदा खोकल्याची समस्या उद्भवल्यास औषध घेण्याची गरज भासत नाही. खोकला आपोआप कमी होतो. याशिवाय काही घरगुती उपाय केल्यास तुम्ही रोज येत असलेल्या खोकल्यापासून आराम मिळवू शकता.
अनेकदा कफ खोकल्यामुळे शारीरिक स्थितीवर परिणाम होतो. अनेकांना रात्री झोपताना खोकला येण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे नीट झोप पूर्ण होत नाही. सध्या कोरोनाच्या माहामारीत साधा सर्दी, खोकला झाला असेल तरी लोकांच्या मनात भीती असते. माय उपचारशी बोलताना डॉ, लक्ष्मीदत्ता शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार खोकताना श्वसनसंस्थेवरही परिणाम होते. अनेकदा खोकल्याची समस्या उद्भवल्यास औषध घेण्याची गरज भासत नाही. खोकला आपोआप कमी होतो. याशिवाय काही घरगुती उपाय केल्यास तुम्ही रोज येत असलेल्या खोकल्यापासून आराम मिळवू शकता.
पोस्टनेसल ड्रिपची तक्रार असो किंवा एसिड रिफ्लक्सची तक्रार डोकं वर ठेवण्यासाठी उशीचा वापर करायला हवा. कारण जेव्हा डोकं सपाट अवस्थेत असते. ते्व्हा कफ एसिड रिफ्लेक्समुळे घश्यात समस्या उद्भवू शकते. डोक थोड्या उंचीवर असल्यास कफ जमा होण्याची स्थिती उद्भवत नाही.
झोपण्याआधी गरम पाण्यानं अंघोळ करा. पण लक्षात ठेवा जर तुम्हाला अस्थमामुळे खोकला येत असेल तर वाफेमुळे समस्या वाढण्याची शक्यता असते. झोपण्याआधी अंथरूण स्वच्छ आहे की नाही हे पाहून घ्या. झोपण्याच्या जागेवर धूळ, माती असल्यास एलर्जीमुळे खोकला आणि शिंका येण्याची शक्यता असते. आठवड्यातून एकदा अंथरूण धुवा.
झोपण्याआधी गरम पाणी किंवा हळदीचं दुध, काढ्याचे सेवन तुम्ही करू शकता आलं, पुदिना असलेली चहा घेतल्यानं खोकल्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.
धुम्रपानाची सवय सोडल्यानं खोकल्याची समस्या कमी होईल. नाक चोंदण्याची समस्या उद्भवत असल्यास नेजल स्प्रेचा वापर करा.
रात्री येणारा खोकला कमी करण्यासाठी स्वतःला हायड्रेट ठेवा. जेणेकरून म्युकस पातळ होईल आणि खोकला येणार नाही.जेवणानंतर लगेचंच झोपण्याची चूक करू नका. त्यामुळे फॅटी एसिड अन्ननलिकेतून घशात परत येतात. त्यामुळे खोकल्याची समस्या वाढते. म्हणून जेवल्यानंतर २ तासांनी झोपा. बेडरुमध्ये रुम फ्रेशनर किंवा स्प्रेचा वापर करू नका.
हे पण वाचा
लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा
युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा
CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार