Back pain : सावधान! जास्तवेळ बसून काम केल्यानं कमी वयातच होऊ शकतो कमरेचा आजार; या उपायांनी मिळवा आराम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 11:47 AM2021-03-23T11:47:35+5:302021-03-23T11:59:25+5:30
Health Tips in Marathi : ऑफिसमध्ये दीर्घकाळ एकाच स्थितीत बसून राहिल्यामुळे मासपेशींत वेदना होतात. सुरूवातीलाच या आजारांकडे लक्ष दिलं नाही तर गंभीर आजारात याचे रूपांतर होऊ शकते. ''
नोकरी करत असलेल्या लोकांचे दिवसातील ८ ते ९ तास ऑफिसमध्ये जातात. त्यामुळे कमरेच्या वेदना जाणवतात, तर कधी पाठ दुखते. वेळीच या समस्यांकडे लक्ष दिलं नाही तर काहीवेळ खुर्चीवर बसणंही कठीण होतं. जास्तीत जास्त लोकांना अशा प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या समस्यांकडे वेळीच लक्ष दिलं तर दीर्घकालीन आजार टाळता येऊ शकतात. पाठीच्या खालच्या भागातील वेदना खासकरून जीवनशैलीतील चुकांमुळे उद्भवतात. लखनौचे प्रसिद्ध फिजियोथेरेपिस्ट डॉ जोहैब काजी यांनी सांगितले की, ''ऑफिसमध्ये दीर्घकाळ एकाच स्थितीत बसून राहिल्यामुळे मासपेशींत वेदना होतात. सुरूवातीलाच या आजारांकडे लक्ष दिलं नाही तर गंभीर आजारात याचे रूपांतर होऊ शकते. ''
पाठीदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी काय करायचे
सगळ्यात आधी तुम्हाला बसण्याच्या स्थितीत सुधारणा करायला हवी. सतत एकाच जागेवर बसून काम न करताना ब्रेक घ्या अन् ३० सेकंद इकडे तिकडे चाला. यादरम्यान मानेचीही योग्य पद्धतीनं हालचाल करा. या व्यतिरिक्त जर तुम्ही कंम्प्यूटरवर काम करत असाल तर मॉनिटर किंवा लॅपटॉप असं ठेवा जेणेकरून तुमच्या मानेला वेदना जाणवणार नाहीत.
काय करायचं नाही?
सर्व प्रथम, हे लक्षात ठेवा की जास्त काळ एकाच स्थितीत बसू नका. शरीरात रक्ताचे अधिक चांगले अभिसरण राखण्यासाठी, फिरत रहा. काही लोक क्रॉस सीटवर बसले आहेत, म्हणजेच एका पायावर दुसर्या पाय ठेवणे, हे योग्य नाही, अशा प्रकारे बसल्यावर समस्या वाढू शकतात. याशिवाय फोनचा वापर कमीत कमी करा. कारण फोनचा वापर जास्त केल्यास सतत खाली वाकावं लागू शकतं. जर आपण आपली जीवनशैली बदलली तर आपण पाठदुखीच्या गंभीर समस्येपासून स्वत: ला वाचवू शकता.
लहान मुलांना सतत बसून राहण्यासाठी फोर्स करू नका. सतत बसून राहणे चांगली सवय नाही. जितकं शक्य आहे तितकी त्यांना चालण्या-फिरण्याची सवय लावा. तुम्ही तुमच्या मुला-मुलींसाठी सर्वात मोठे आदर्श आहात. त्यामुळे अशी लाइफस्टाइल अजिबात अवलंबू नका ज्याचा तुमच्या मुला-मुलींवर वाईट प्रभाव पडेल.
मुलांना नेहमी सरळ बसण्याचा सल्ला द्या. याचीही काळजी घ्या की, तुमच्या मुला-मुलींची बॅगही जास्त जड असू नये. जर कंबरदुखीमुळे तुमची मुलं-मुली झोपू शकत नसतील किंवा त्यांच्या रोजच्या गोष्टींवर याचा नकारात्मक प्रभाव पडत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.
CoronaVirus News : चिंताजनक! महाभयंकर असणार कोरोना व्हायरसची दुसरी लाट; संशोधकांचा धोक्याचा इशारा
खेळताना, सायकल चालवताना होणाऱ्या जखमांची माहिती घेत रहा. जेणेकरून अशा स्थितीमध्ये तुम्ही वेळेवर उपाय करू शकाल. जेव्हा तुमची मुलं एखाद्या खेळण्याच्या स्पर्धेत भाग घेत असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घ्या. समजा तुमच्या मुलांनी स्कीइंग, स्केटिंग किंवा स्नोबर्डिंग शिकणे सुरू केले असेल तर आधी या खेळांचं टेक्निक, स्टाइल आणि इतरही काही गोष्टी जाणून घ्या.
सायकल किंवा बाईक चालवताना मुलांना हेल्मेट, माऊथ गार्ड, रिस्ट गार्ड आणि नी गार्ड वापरावं. याने जखम होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. मुलं-मुली तरूण होत असताना त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करा आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठी त्यांना प्रोत्साहित करा.