रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी घरच्याघरी रोज प्या 'असा' काढा; संसर्गापासून रहाल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 04:31 PM2020-06-09T16:31:19+5:302020-06-09T16:32:33+5:30
रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळी औषध घेण्याची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून काढा तयार करून तुम्ही फिट राहू शकता.
कोरोना व्हायरसपासून संपूर्ण जगाला मुक्त करण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ लस आणि औषधांवर प्रयोग करत आहेत. सध्या लॉकडाऊन सुद्धा उठवण्यात आला आहे. जोपर्यंत लस शोधली जात नाही तोपर्यंत विषाणूंपासून लांब राहण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळी औषधं घेण्याची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून काढा तयार करून तुम्ही फिट राहू शकता.
आयुष मंत्रालयाकडून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लोकांना काढा पिण्याचा सल्ला दिला जात आहे. इतकंच नाही तर आयुष मंत्रालयाकडून काढा तयार करण्यासंबंधी माहिती दिली आहे. जेणेकरून काढ्याच्या सेवनाने आरोग्यावर चांगला परिणाम जाणवेल. काढा तयार करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.
या काढ्याच्या सेवनाने तुम्हाला संक्रमणापासून लांब राहता येईल. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती बळकट झाल्यामुळे व्हायरस सहजासहजी अटॅक करू शकणार नाही. जाणून घ्या कसा तयार करायचा हा काढा.
सगळ्यात आधी ७ ते ८ तुळशीची पानं, दालचीनी, सुंठ, काळी मिरी यांची पावडर तयार करून घ्या. याचे गोळे तयार करून १५० मिली पाण्यात उकळून घ्या त्यात टी बॅग ७ ते ८ वेळा घाला, दिवसातून एक ते दोनवेळा या पाण्याचे सेवन करा. याशिवाय तुम्ही आयुर्वेदिक चहा सुद्धा पिऊ शकता. चहा म्हणजे टी बॅग्स वापरून गरम पाण्यात सात आठ वेळा बुडवून केलेला सौम्य चहा. डस्ट प्रकारात मोडणारे अगदी बारीक पावडर स्वरूपातील चहा पाण्यात खूप उकळला की अतिशय स्ट्रॉंग, उग्र चहा तयार होतो.
पित्ताचा त्रास असलेल्यांना व्यक्तींनी वारंवार आणि खूप उकळलेला, आलं, गवती चहा वगैरे टाकलेला चहा प्यायला तर त्यांना तो सहन होत नाही. जिभेला फोड येणं, घशात आग होणं या तक्रारी जाणवू शकतात. चहा अगदी गरम गरम प्यायला तरी यांना त्रास होतो. त्यामुळे दिवसांतून दोनचं वेळा या काढ्याचे किंवा आयुर्वेदिक चहाचे सेवन करा.
आता माऊथ वॉशच्या वापराने टाळता येणार कोरोनाचा संसर्ग; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत.
कोरोनाशी लढण्यासाठी भारतीय कंपन्यांचं मोठं पाऊल; आयुर्वेदिक औषधांची चाचणी सुरू