बापरे! नखांवरून समजतो मोठ्या आजाराचा धोका; 'या' संकेतांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 04:09 PM2024-06-12T16:09:58+5:302024-06-12T16:18:31+5:30
नखांमध्ये जर पाच गोष्टी कधी दिसल्या तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण ते काही आजारांचे संकेत देतात. याचा संबंध नखांचा रंग आणि त्यांच्या फ्लेक्सिबिलिटीशी आहे. याबाबत जाणून घेऊया...
कोणताही आजार सुरू होण्यापूर्वी शरीरात काही लक्षणं दिसू लागतात आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तो आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. अशा परिस्थितीत शरीरावर दिसणाऱ्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
नखांमध्ये जर पाच गोष्टी कधी दिसल्या तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण ते काही आजारांचे संकेत देतात. याचा संबंध नखांचा रंग आणि त्यांच्या फ्लेक्सिबिलिटीशी आहे. याबाबत जाणून घेऊया...
नखं वारंवार तुटणं
जर तुमची नखं खूप कमकुवत असतील आणि वारंवार तुटत असतील तर ते तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता दर्शवते. म्हणजेच तुमच्या शरीरात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता आहे ज्यामुळे नखं कमकुवत झाली आहेत.
नखांचा रंग फिका होणं
साधारणपणे, व्यक्ती जसजशी मोठी होते तसतसा नखांचा रंग फिका पडू लागतो, परंतु जर लहान वयातच तुमची नखं फिकी दिसत असतील तर ते एखाद्या मोठ्या आजाराचे संकेत आहेत. ज्यामध्ये रक्ताची कमतरता, अशक्तपणा, कुपोषण, लिव्हरशी समस्या अशा अनेक गंभीर आजारांची लक्षणं असतात.
नखांवर पांढरे डाग
अनेक लोकांच्या नखांवर पांढरे डाग दिसतात, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात, परंतु हे आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी, प्रोटीन आणि झिंकची कमतरता दर्शवतं. अशा वेळी वेळीच आहारात बदल करायला हवा.
नखांवर पांढरी रेषा
अनेकांच्या नखांवर पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसतात आणि नखं निस्तेज दिसतात. या पांढऱ्या रेषा किडनी आणि लिव्हरशी संबंधित आजार दर्शवतात. ही पांढरी रेषा हेपेटायटीससारख्या गंभीर आजाराचे देखील संकेत करतात, त्यामुळे त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
नखांचा रंग बदलणं
जर तुमच्या नखांचा रंग बदलत असेल, ती निळी दिसत असतील किंवा त्यामध्ये काळे किंवा निळे डाग दिसत असतील, तर तुम्ही सावध व्हा. कारण याचा अर्थ तुमच्या नखांमध्ये रक्ताभिसरण नीट होत नाही होत आहे आणि हे हृदयाशी संबंधित आजाराचे संकेत आहेत.