कफ आणि खोकल्याने असाल हैराण तर करा हा साधा-सोपा घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 03:50 PM2022-10-24T15:50:23+5:302022-10-24T15:50:44+5:30
आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाल्याने वेगवेगळे आजारही आपल्याला होतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
पावसाळ्यात सर्दी-खोकला होणे सामान्य बाब आहे. पण कफ झाल्यावर फार जास्त त्रास होतो. या दिवसात वायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनही वाढतं. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाल्याने वेगवेगळे आजारही आपल्याला होतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
विशेष काळजी घेतल्यावरही तुम्हाला कफ असलेला खोकला झाला तर यावर एक चांगला घरगुती उपाय आहे. कांद्याचं पाणी वापरून तुम्ही कफ दूर करू शकता. कांद्याने पदार्थांना चव मिळण्यासोबतच याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात. कांद्याचं पाणी तुमच्या शरीराला एनर्जी देण्यासोबतच वायरल आजारांपासूनही तुमचा बचाव करतो.
कसा कराल तयार?
एका कांद्याचे बारिक तुकडे करा. नंतर हे कांद्याचे तुकडे एका वाटीमध्ये टाका आणि त्यात पाणी टाकून ६ ते ८ तास तसंच राहू द्या. नंतर हे पाणी दिवसातून दोन किंवा तिनदा २-२ चमचे सेवन करा. हे पाणी लहान मुलांनाही दिलं जाऊ शकतं. पण त्यांना कमी प्रमाणात द्यावं. तसेच हे पाणी टेस्टी करण्यासाठी तुम्ही यात थोडं मधही मिश्रित करू शकता.
जाणून घ्या फायदे
कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इफ्लेमेटरी गुण असतात. जे थंडीपासून बचाव करण्यात फायदेशीर ठरतात. त्यासोबतच कांद्यामध्ये आढळणाऱ्या थायोसल्फेट, सल्फाइड आणि सल्फोक्साइड तत्वांचाही आरोग्याला फायदा होतो. खासकरून कांद्यामध्ये असणारे अॅंटी-मायक्रोबिअल तत्व कफ शरीरातून बाहेर काढण्यास फायदेशीर ठरतात. याने फुप्फुसांमधून टॉक्सिन्स बाहेर निघतं. तसेच कांद्याने इम्यून सिस्टीमही मजबूत होते.
(टिप : हे उपाय केवळ तुमच्या माहितीसाठी सांगण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण काही लोकांना याची अॅलर्जी सुद्धा असू शकते.)