रात्री शिल्लक राहिलेला भात पुन्हा पुन्हा गरम करून का खाऊ नये?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:29 PM2022-08-16T16:29:47+5:302022-08-16T16:31:19+5:30

Health Tips : अनेकजण रात्रीचा शिल्लक राहिलेला भातही सकाली गरम करुन खातात. पण हा शिल्लक राहिलेला भात स्टोर करुन ठेवताना काळजी घ्यायला हवी.

Health Tips : Reheating rice cause food poisoning in Marathi | रात्री शिल्लक राहिलेला भात पुन्हा पुन्हा गरम करून का खाऊ नये?

रात्री शिल्लक राहिलेला भात पुन्हा पुन्हा गरम करून का खाऊ नये?

googlenewsNext

जेवणासोबत भात खाणे ही अनेकांची रोजची सवय असेल. पण भाताने केवळ पोट भरतं असं नाहीतर भाताचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. काही लोक असा विचार करतात की, भात खाल्ल्याने त्यांचं वजन वाढेल किंवा त्यांचं पोट बाहेर येईल. मात्र काही भाताचे शौकीन लोक ही दिवसातून एकदा तरी भात आवर्जून खातात. 

अनेकजण रात्रीचा शिल्लक राहिलेला भातही सकाली गरम करुन खातात. पण हा शिल्लक राहिलेला भात स्टोर करुन ठेवताना काळजी घ्यायला हवी. इतकेच नाहीतर एकदा शिजवलेल्या भाताला पुन्हा एकपेक्षा जास्त वेळ गरम करू नये. असं केल्यास तुम्हाला उल्टी, पोट बिघडणे यासोबतच हृदयाशी संबंधीत आजारही होऊ शकतात.

काय म्हणतात एक्सपर्ट?

ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कच्च्या तांदुळामध्ये बॅसिलस सेरस नामक बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया तांदूळ शिजवल्यावरही जिंवत राहतात. एक्सपर्टनुसार, तुम्ही एकदा शिजवलेला भात पुन्हा केवळ एकदाच गरम करु शकता. एकापेक्षा जास्तवेळ हा भात गरम केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

काय होऊ शकतो त्रास?

पुन्हा पुन्हा गरम केलेला भात खाल्ल्याने तुम्हाला उल्टी, लूज मोशन, पोट दुखणे अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे एक्सपर्ट हे तांदूळ शिजवल्यावर एका तासाच्या आत फ्रिजमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात. कारण त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. 

Web Title: Health Tips : Reheating rice cause food poisoning in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.