कधीच आजारी पडायचं नसेल तर वाचा पाणी पिण्याची योग्य पद्धत, इतकं तर करूच शकता!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 03:07 PM2022-12-29T15:07:22+5:302022-12-29T15:07:42+5:30
Health Tips : चुकीच्या वेळेवर, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या प्रमाणात पाणी प्यायल्याने पोट दुखू शकतं, पचनक्रियेत समस्या होऊ शकते, डायबिटीसचा धोका राहतो, ब्लड प्रेशर, डोकेदुखी, जडपणा, किडनी समस्या आणि सुस्तीसारखी समस्याही होऊ शकतात.
Health Tips : तुम्हाला जर कुणी सांगितलं की, तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पिता तर तुम्ही म्हणाल यात कसली आली पद्धत? कारण साधारणपणे जास्तीत जास्त लोक ग्लासने किंवा बॉटलने गटागट पाणी पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पाणी पिण्याची हीच सवय चुकीची आहे. ही बाब वरवर जरी सामान्य वाटत असली तरी सामान्य अजिबात नाही. जर तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने पाणी पित असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चला जाणून घेऊ पाणी पिण्याची योग्य पद्धत...
चुकीच्या वेळेवर, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या प्रमाणात पाणी प्यायल्याने पोट दुखू शकतं, पचनक्रियेत समस्या होऊ शकते, डायबिटीसचा धोका राहतो, ब्लड प्रेशर, डोकेदुखी, जडपणा, किडनी समस्या आणि सुस्तीसारखी समस्याही होऊ शकतात. प्रत्येकाच्या शरीर रचनेनुसार सगळ्यांची पाण्याची गरज वेगवेगळी असू शकते, पण पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही आजारी पडू नये.
मेटाबॉलिज्म मजबूत होतं
असे मानले जातात की, दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्यावे. कारण भरपूर पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं, ज्याने तुमची पचनक्रिया योग्य पद्धतीने होते. पाणी पित राहिल्याने शरीरात फॅट जमा होत नाही. सोबतच दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहिल्याने जास्त खाण्याची सवयही दूर होते. म्हणजे याचा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.
काय आहे पाणी पिण्याची योग्य पद्धत?
सकाळी उठल्यानंतर २ ग्लास पाणी आवर्जून प्यावे. आयुर्वेदानुसार, सकाळी काहीही खाण्यापूर्वी पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. असं केल्याने शरीरातून टॉक्सिन्स बाहेर निघतात आणि शरीराची सफाई चांगली होते. सोबतच सकाळी अनोशा पोटी पाणी प्यायल्याने पोटदुखीपासूनही आराम मिळतो. तसेच जेवण केल्यावर साधारण ३० मिनिटेआधी पाणी प्यावे, याने जेवण सहजपणे पचतं. तसेच जेवण करताना आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर अर्धा तासानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
कधी पाणी पिणे फायदेशीर
आंघोळ करण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशरची समस्या राहत नाही आणि झोपण्याआधी पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. एक्सरसाइज केल्यावर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होणार नाही.
असं अजिबात करू नका
आयुर्वेदानुसार, पाणी शांतपणे खाली बसून आरामात प्यावे. उभं राहून गटागट पाणी प्यायल्याने पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जातं. त्यामुळे पाण्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. तसेच पाणी एकदाच गटागट करून पिऊ नये. एक एक घोट घेत हळू पाणी प्यावे. याचं कारण आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत आपली लाळही पोटात जाते. याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.