नखं खाण्याची सवय अशी पडू शकते महागात, वाढू शकतो या गंभीर आजारांचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 11:23 AM2022-08-19T11:23:20+5:302022-08-19T11:24:02+5:30
Health Tips : खरंतर ही सवय मोडणं अनेकांसाठी कठीण असतं. पण हे अशक्य नक्कीच नाहीयेत. चला जाणून घेऊया तुमच्या सवयीमुळे तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना नखं खाण्याची, कुरतडण्याची सवय बघायला मिळते. अनेकांमध्ये नखं खाण्याची ही सवय असण्याची वेगवेगळी कारणे बघायसा मिळतात. पण नखं खाल्ल्याने केवळ तुमच्या नखांचं नुकसान होतं असं नाहीतर तुम्हाला अनेक आजारांचाही सामना करावा लागतो. आपल्या नखांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू असतात, ज्यामुळे तुम्हारा आजारपण येतं. खरंतर ही सवय मोडणं अनेकांसाठी कठीण असतं. पण हे अशक्य नक्कीच नाहीयेत. चला जाणून घेऊया तुमच्या सवयीमुळे तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.
आजारी पाडणारे बॅक्टेरिया - नखांमध्ये साल्मोनेला आणि ई कोलाई सारखे रोग निर्माण करणारे बॅक्टेरिया असतात. जेव्हा तुम्ही दातांनी नखं खाता तेव्हा ते तुमच्या तोंडात सहज शिरतात. त्यामुळे तुम्ही आजारी पडता.
त्वचा विकार - नखं खाल्ल्याने बोटांच्या त्वचेला इजा होते. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. याच कारणाने तुम्हाला स्कीन इन्फेक्शन होण्य़ाची दाट शक्यता असते.
दातांचं नुकसान - नखं खाण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुमच्या दातांचं नुकसान होतं. नखांमधून निघणारी घाण तुमच्या दातांना कमजोर करते. अनेक अभ्यासांमधूनही हे समोर आलंय की, नखं खाल्ल्याने दात कमजोर होतात.
त्वचेला जखमा - सतत नखं खाणाऱ्या लोकांना डर्मेटोफेजिया नावाच्या आजाराने ग्रस्त होतात. या आजारामुळे त्वचेवर जखमा होऊ लागतात.
तणाव - एका अभ्यासातून हे समोर आलं आहे की, जे लोक सतत नखं खातात जे अधिक तणावात असतात.
कॅन्सर होण्याचा धोका - नेहमी नखं खाल्ल्याने आतड्यांचा कॅन्सर होऊ शकतो. नखं खाल्ल्याने नखातील बॅक्टेरिया आतड्यांमध्ये जातात आणि यामुळे कॅन्सरसारखा रोगही होऊ शकतो.
या सवयीपासून अशी मिळवा सुटका
1) जेव्हाही तुम्हाला नखं करतडण्याची इच्छा होईल लगेच दुसरीकडे लक्ष केंद्रीत करा. असं काही वाटलं तर लगेच एखादं फळ खाण्यासाठी घ्या. याने तुमचं मन डायव्हर्ट होईल. तसेच नखं खाणं रोखण्यासाठी तुम्ही च्युईंगम खाऊ शकता.
2) नखं लहान ठेवा : नखं असतील तरच तुम्ही नखं खाऊ शकाल. त्यामुळे नखं वाढलेले असेल तर लगेच ते कापा. नखं जराही वाढले की, ते ट्रिम करत रहा.