Health Tips : टॉयलेटसंबंधी ही चूक तुम्हाला पडू शकते महागात, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 12:42 PM2022-05-05T12:42:40+5:302022-05-05T12:43:15+5:30
Health Tips : टॉयलेट पेपरबाबत सांगायचं तर मार्केटमध्ये याचेही अनेक पर्याय मिळतात. अनेक लोक सेंटेड टॉयलेट पेपर खरेदी करतात.
Health Tips : टॉयलेटला गेल्यावर अनेकांना सवय असते की, ते टिश्यू पेपरने त्यांचा प्रायव्हेट पार्ट साफ करतात. असं करणं एक चांगली सवय मानली जाते. खासकरून महिलांसाठी. हे गरजेचं असतं की, प्रायव्हेट पार्टमध्ये ओलावा राहू नये. अनेकदा या ओलाव्यामुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होतं.
टॉयलेट पेपरबाबत सांगायचं तर मार्केटमध्ये याचेही अनेक पर्याय मिळतात. अनेक लोक सेंटेड टॉयलेट पेपर खरेदी करतात. जो आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. डॉक्टर नेहमीच हा सल्ला देतात की, ज्या वस्तूंचा वापर तुम्ही प्रायव्हेट पार्टसाठी करता त्या वस्तू केमिकल फ्री आणि सेंट फ्री असायला हव्या. कारण या वस्तू आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात.
सेंटेड टॉयलेट पेपरमध्ये टॉक्सिन सारखे क्लोरीन ब्लीच आणि फॉर्मलाडेहाइड असतात. या पदार्थांमुळेच टॉयलेट पेपर सेंटेड होतो. आपल्या मलद्वाराच्या आजूबाजूची त्वचा फार नाजूक असते. अशात पुन्हा पुन्हा या केमिकल्सने प्रायव्हेट पार्ट साफ करणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे यांचा वापर केला जावा.
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करण्यासाठी सेटेंड टॉयलेट पेपरचा वापर केल्याने तुमच्या इंटिमेट हायजीनसाठीही धोकादायक ठरू शकतं. जर तुम्ही सेंटेड टिश्यू पेपरचा वापर रोज केला तर तुम्हाला त्वचेवर जळजळ होऊ शकते. सोबतच सेंटेड टिश्यू पेपरचा वापर केल्याने त्वचेवर खाज आणि रॅशेजही होऊ शकतात.
डॉक्टरही सांगतात की, सेंटेड टिश्यू पेपर्सचा वापर जास्त काळ केल्याने मूळव्याधाचीही समस्या होऊ शकते. हा आजार झाल्यावर मलद्वारापर्यंत रक्त पुरवठा करणाऱ्या नसांमध्ये सूज आणि वेदना होतात. ज्याने मलत्याग करताना समस्या होऊ शकते. त्यासोबतच सेंटेड टिश्यू पेपर्सने इतरही अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. जसे की पॉलिश्ड अनस सिंड्रोम, मलाशयाजवळील स्कीन फाटणे, मलाशयातून रक्त येणे किंवा गाठ तयार होणे.