पावसाळ्यात विषाणूंच्या संक्रमणापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले 'हे' सोपे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 11:08 AM2020-07-01T11:08:58+5:302020-07-01T11:27:57+5:30
खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यास रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होऊ शकते. त्यामुळे आजारांपासून बचाव करता येऊ शकतो.
पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यात डासांमुळे पसरणारे आजार, ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा समावेश आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने विषाणूंपासून बचावासाठी काही उपाय सांगितले आहेत. आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यात सर्दी, खोकला, घश्यात खवखवणं, शिंका येणं यांसारख्या समस्या उद्भवतात. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यास रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होऊ शकते. त्यामुळे आजारांपासून बचाव करता येऊ शकतो.
साधारणपणे पावसाळ्यात आजारांपासून बचाव करण्यासाठी हळद घातलेले दूध प्यायल्यास संसर्गाचा धोका कमी होतो. खोकला, सर्दी, घश्यात खवखवणं, या साध्या समस्यापासून बचाव करायचा असल्यास रोज हळद घातलेलं दूध प्यायला हवं. बंद झालेलं नाक मोकळं होण्यासाठी तसंच डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्यात पुदिना किंवा विक्स घालून तुम्ही वाफ घेऊ शकता. हवंतर तुम्ही गरम पाण्यात लेमन ग्रास ऑईल, ट्री-ट्री ऑईल सुद्धा घालू शकता.
सामान्य फ्लूची लक्षणं
श्वास घ्यायला त्रास होणे
नाक चोंदणे
खोकला
अंगदुखी
डोकेदुखी
मासपेशींमध्ये वेदना होणं.
उपाय
घरात राहूनही तुम्ही फ्लूपासून बचाव करू शकता. जसजसा पावसाळा सुरू होतो. तसंतसं आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं गरजेचं आहे. शरीर चांगले राहण्यासाठी नैसर्गीक आणि घरगुती उपाय नेहमी फायदेशीर ठरतात.
जेव्हा सर्दी किंवा खोकल्यामुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणं हा आहे. गरम पाण्याची वाफ घेतल्याने किंवा गरम पाणी प्यायल्याने आजारांपासून लांब राहता येऊ शकतं.
पुदीना, ओवा, कापूर, निलगीरी एकत्र करून आयुर्वेदिक लेप तयार करून घश्याला लावल्यास, जळजळीची समस्या दूर करता येऊ शकते. हा लेप सर्दी आणि फ्लूची समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा लेप तुम्हाला जवळच्या मेडिकलमध्येही उपलब्ध होऊ शकतो. जर घशात वेदना होत असतील तर तुम्ही या प्रकारचा लेप लावून आराम मिळवू शकता. घरगुती उपाय करूनही आराम न मिळाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा.
'या' देशात कोरोनाची पहिलीच लाट; कोरोना दीर्घकाळ माणसांची पाठ सोडणार नाही, तज्ज्ञांचा दावा
CoronaVirus : पतंजलीच्या कोरोनिलला अखेर आयुष मंत्रालयाची मान्यता; पण घातली महत्त्वाची अट…