हाता-पायांमध्ये येणाऱ्या झिणझिण्यांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या कशामुळे होते ही समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 02:16 PM2022-09-09T14:16:42+5:302022-09-09T14:17:39+5:30
Sensation In Body Parts: शरीरात कोणतीही क्रिया विनाकारण होत नाही. यामागे काहीना काही कारण असू शकतं. शरीरात झिणझिण्याचं येण्याचं कारण आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता आहे. चला जाणून घेऊ याची कारणे आणि उपाय...
Sensation In Body Parts: हात आणि पायांमधध्ये झिणझिण्या येणं सामान्य बाब आहे. जर आपण जास्त वेळ एकाच पोजिशनमध्ये बसलो तर झिणझिण्या येण्याची समस्या होऊ लागते. पण शरीरात पुन्हा पुन्हा झिणझिण्या येत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. शरीरात कोणतीही क्रिया विनाकारण होत नाही. यामागे काहीना काही कारण असू शकतं. शरीरात झिणझिण्याचं येण्याचं कारण आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता आहे. चला जाणून घेऊ याची कारणे आणि उपाय...
काय असते झिणझिण्याची येण्याची समस्या?
झिणझिण्या जास्त जास्त वेळ बसल्याने किंवा हातांमध्ये होणाऱ्या गुदगुल्या आहेत. एकाच पोजिशनमध्ये राहिल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन योग्यप्रकारे होत नाही आणि शरीरात झिणझिण्या येऊ लागतात.
काय आहेत याची कारणे?
जास्त वेळ एकाच जागी बसलण्याने झिणझिण्या येणं सामान्य बाब आहे. पण असं नेहमी नेहमी होत असेल तर याचा अर्थ शरीरात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई ची कमतरता झाली आहे. हे व्हिटॅमिन असलेले पदार्थ भरपूर खाऊन तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
व्हिटॅमिन बी कशातून मिळणार?
कडधान्य, बीन्स, डाळ, मीट, मासे, बटाटे आणि ड्राय फ्रूट्समधून तुम्हाला व्हिटॅमिन बी मिळू शकतं. रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करावा लागेल. त्याशिवाय डेअरी प्रॉडक्ट्स जसे की, पनी, दूध, छास, दह्यातूनही तुम्हाला व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात मिळेल. शाकाहारी लोक रोज सकाळी नाश्त्यात मोड आलेले कडधान्य खाऊ शकतात.
व्हिटॅमिन कशातून मिळणार?
व्हिटॅमिन ई ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात आढळून येतं. एवोकाडो हे एक असं फळ आहे ज्यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. बदामातही व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. सूर्यफूलाच्या बीया आणि तेलातही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई आढळून येतं.