टोमॅटो खाण्याचे फायदे माहीत असतील, आता जाणून घ्या टोमॅटो जास्त खाण्याचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 03:15 PM2023-03-23T15:15:07+5:302023-03-23T15:15:17+5:30

Side Effects Of Consuming Tomatoes: जर तुम्ही टोमॅटोचं अधिक सेवन केलं तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. आतापर्यंत तुम्हाला फक्त टोमॅटोचे फायदे माहीत असतील, आता टोमॅटोचे नुकसान जाणून घेऊ.

Health Tips : Side effects of eating more tomatoes, know the reason | टोमॅटो खाण्याचे फायदे माहीत असतील, आता जाणून घ्या टोमॅटो जास्त खाण्याचे मोठे नुकसान

टोमॅटो खाण्याचे फायदे माहीत असतील, आता जाणून घ्या टोमॅटो जास्त खाण्याचे मोठे नुकसान

googlenewsNext

Side Effects Of Consuming Tomatoes: टोमॅटो खाणं जास्तीत जास्त लोकांना आवडतं. कारण ते टेस्टला चांगले असतात आणि आरोग्याला त्याचे फायदेही अनेक होतात. यात फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. त्यामुळे हे खाल्ल्याने इम्यूनिटी मजबूत होते. पण जर तुम्ही टोमॅटोचं अधिक सेवन केलं तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. आतापर्यंत तुम्हाला फक्त टोमॅटोचे फायदे माहीत असतील, आता टोमॅटोचे नुकसान जाणून घेऊ.

अ‍ॅसिडिटीची समस्या

जास्त टोमॅटो खाल्ल्याने तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ लागते. कारण यात अ‍ॅसिडिक प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे तुम्हाला अ‍ॅसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते. अशात ज्या लोकांना आधीच अ‍ॅसिडिटीची समस्या आहे अशा लोकांनी टोमॅटोचं सेवन करू नये किंवा कमी करावं.

किडनी स्टोन

टोमॅटोचं अधिक सेवन केल्याने तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. याचं कारण टोमॅटोच्या बीया सहजपणे किडनीमध्ये पोहोचून स्टोन बनवण्याचं काम करू लागतात. ज्यामुळे जास्त टोमॅटो खाणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

छातीत जळजळ

टोमॅटोचं अधिक सेवन केल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या अधिक होते. कारण यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे पोटात गॅसची समस्या होते आणि छातीत जळजळ होऊ लागते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी चं सेवन केल्यानेच छातीत जळजळ होत असते.

शरीरातून दुर्गंधी

जास्त टोमॅटो खाल तर शरीरातून दुर्गंधी येण्याची समस्या वाढू शकते. कारण टोमॅटोमध्ये टरपीन्स नावाचं तत्व आढळतं. ज्याने शरीरातून दुर्गंधी येण्याची समस्या वाढते.

जॉइंट्समध्ये वेदना

टोमॅटोचं जास्त सेवन केल्याने जॉइंट्समध्ये वेदना होण्याची समस्या होऊ शकते. याचं कारण टोमॅटोमध्ये सोलनिन नावाचं अल्कलॉइड असतं, जे जॉइंट्समध्ये सूज येण्याचं कारण ठरतं. ज्यामुळे जॉइंट्समध्ये वेदना होतात.

Web Title: Health Tips : Side effects of eating more tomatoes, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.