या 4 समस्या असलेल्यांनी चुकूनही खाऊ नये आवळा, होऊ शकतं मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:53 AM2022-12-02T09:53:29+5:302022-12-02T09:53:48+5:30
Amla Side Effects: आवळ्याचं सेवन लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात. पण याने जेवढे फायदे आहेत तेवढेच काही नुकसानही आहेत. 3 असे आजार आहेत ज्यात आवळा खाणं नुकसानकारक ठरू शकतं.
Amla Side Effects: शरीराची इम्यूनिटी वाढवण्यासाठी आवळा फार फायदेशीर मानला जातो. हे आंबट फळ बरेच लोक हिवाळ्यात आनंदाने खातात. यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ज्याने केसगळती रोखता येतं, डोळ्यांची दृष्टी चांगली होते आणि त्वचेलाही याचे अनेक फायदे होतात. आवळ्याचं सेवन लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात. पण याने जेवढे फायदे आहेत तेवढेच काही नुकसानही आहेत. 3 असे आजार आहेत ज्यात आवळा खाणं नुकसानकारक ठरू शकतं.
सर्दी-पळसा असलेल्या लोकांनी
आवळा थंड असतो. त्यामुळे सर्दी-पळसा, खोकला किंवा ताप असलेल्या लोकांनी आवळ्याचं सेवन अजिबात करू नये. जर तब्येत बरी नसतानाही तुम्ही याचं सेवन करत असाल तर तुमचं बॉडी टेंपरेचर आणखी कमी होऊ शकतं. ज्यामुळे तुम्हाला आणखी समस्येचा सामना करावा लागू शकतो.
लो ब्लड शुगरने पीडित रूग्ण
जे लोक अॅंटी-बायोटिक औषधांचं सेवन करतात, त्यांनीही आवळा खाणं टाळलं पाहिजे. त्यासोबतच लो ब्लड शुगर असलेल्या रूग्णांनीही याचं सेवन करू नये. असं केल्याने तुमची तब्येत आणखी बिघडू शकते.
किडनीच्या रूग्णांसाठी आवळा नुकसानकारक
जे लोक किडनीच्या समस्येने पीडित आहेत त्यांनीही आवळ्याचं सेवन अजिबात करू नये. याचं कारण म्हणजे आवळ्याचं सेवन केल्याने शरीरात सोडिअमचं प्रमाण वाढतं. जे फिल्टर करणं किडनीसाठी अवघड होऊन जातं. अशात किडनी फेल्युअरची वेळही येऊ शकते.
सर्जरीच्या आधी आवळा खाणं टाळा
जर एखाद्या रूग्णावर कशाप्रकारची सर्जरी होणार असेल तर ऑपरेशनच्या दोन आठवड्याआधी आवळ्याचं सेवन बंद केलं पाहिजे. असं केलं नाही तर तुमच्या धमण्या फुटू शकतात आणि ब्लीडिंगचा धोका वाढतो.