Health Tips: तुम्हीही रोज चहासोबत ब्रेड खाता का? आजच बंद करा नाही तर पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:50 AM2022-09-12T11:50:03+5:302022-09-12T11:50:25+5:30
Side Effects Of Bread: हा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे फार लोकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊ चहा आणि ब्रेडचा नाश्ता केल्याने काय-काय नुकसान होतात.
Side Effects Of Bread: भारतात जास्तीत जास्त लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात चहा आणि ब्रेडने करतात. चहा आणि ब्रेड हा रोजचा त्यांचा नाश्ता झाला आहे. खासकरून ऑफिस आणि कॉलेजला जाणारे लोक तर घाईत चहा आणि ब्रेडचाच नाश्ता करतात. पण हा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे फार लोकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊ चहा आणि ब्रेडचा नाश्ता केल्याने काय-काय नुकसान होतात.
पचनक्रिया बिघडते
पॅकेटमध्ये बंद असलेल्या पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्स आणि अनेक घातक केमिकल्स असतात. जे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. ब्रेड मैद्यापासून तयार केले जातात. मैद्यात फायबर फार कमी असतं. ज्यामुळे ब्रेड पचनासाठी चांगलं नसतं. ब्रेड आपल्या डायजेशन सिस्टीमला नुकसान पोहोचवतं. तसेच यामुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो.
डायबिटीसमध्ये घातक
चहासोबत ब्रेड खाल्ल्यान ब्लडमध्ये शुगरचं प्रमाण वाढू शकतं. ब्रेड-चहात असलेल्या तत्वांमुळे इन्सुलिन ट्रिगर होतं. अशात ब्रेड डायबिटीसच्या रूग्णांसाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं.
हृदयासाठी हानिकारक
ब्रेडमध्ये असलेल्या प्रिजर्वेटिव्ह आणि केमिकल्समुळे हृदयरोगाच्या रूग्णांना फार नुकसान होतं. जर नाश्त्यात चहासोबत ब्रेड खात असाल तर कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर वाढू शकतं. ब्रेड खाल्ल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो. यात सोडिअमचं प्रमाण जास्त असतं. जे हार्ट अटॅकसाठी जबाबदार असतं.
आतड्यांमध्ये फोड
ब्रेड आणि चहा सकाळी खाल्ल्याने पोटातील आतड्यांना फोड येतात. ब्रेड पचनक्रियेसाठी नुकसानकारक आहे. त्यात ते जर चहासोबत खाल्ले तर अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. ज्यामुळे आतड्यांमध्ये फोड येऊ शकतात.
वजन वाढतं
ब्रेडमध्ये कार्ब, मीठ आणि रिफाइंड शुगर असतं. जे वाढवतं. ब्रेड जर रोज रोज खाल्ले तर वेगाने वजन वाढू शकतं. ब्रेड आणि चहाचं सेवन त्वचेसाठीही हानिकारक ठरतं.