Sign of Kidney Failure: तुमची किडनी कधी होणार फेल, लघवीतून मिळतो हा मोठा संकेत; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 11:57 AM2022-01-29T11:57:53+5:302022-01-29T11:59:09+5:30

Sign of Kidney Failure: 'द सन' च्या एका रिपोर्टनुसार, शुगर लेव्हल हाय झाल्यावर किडनीला (Kidney Failure) ब्लड सप्लाय करणाऱ्या नसांना नुकसान पोहोचू शकतं.

Health Tips : Sign of kidney failure, diabetes, high blood pressure | Sign of Kidney Failure: तुमची किडनी कधी होणार फेल, लघवीतून मिळतो हा मोठा संकेत; वेळीच व्हा सावध

Sign of Kidney Failure: तुमची किडनी कधी होणार फेल, लघवीतून मिळतो हा मोठा संकेत; वेळीच व्हा सावध

googlenewsNext

Sign of Kidney Failure: डायबिटीज (Diabetes) एक असा आजार आहे ज्याला सायलेंट किलर (Silent Killer) म्हटलं जातं. जर डायबिटीज कंट्रोलच्या बाहेर गेला तर याचा शरीरातील इतर अवयवांवर प्रभाव पडू शकतो. ज्याने व्यक्तीला मृत्यूचाही धोका वाढू शकतो.

'द सन' च्या एका रिपोर्टनुसार, शुगर लेव्हल हाय झाल्यावर किडनीला (Kidney Failure) ब्लड सप्लाय करणाऱ्या नसांना नुकसान पोहोचू शकतं. असं झालं तर किडनी रक्ताची योग्य प्रकारे स्वच्छता करू  शकणार नाही आणि किडनी फेल होते. अशात शरीराचं ब्लड प्रेशर हाय होऊ शकतं. ज्याने तुम्हाला कोणत्याही वेळी हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.

लघवीतून मिळतो किडनी फेल झाल्याचा संकेत

रिपोर्टनुसार, जे लोक डायबिटीजचे रूग्ण असतात, त्यांची लघवी वेळोवेळी असे काही संकेत देते, ज्यावरून समजतं की किडनी जास्त प्रेशरमध्ये काम करत आहे आणि लगेच उपचाराची गरज आहे. वेळीच जर उपचार  केले नाही तर किडनी फेल होऊ शकते. ज्यामुळे व्यक्तीला आपला जीवही गमवावा लागू शकतो.

लघवीतून काय मिळतो संकेत?

बर्मिंघममध्ये क्वीन एलिजाबेथ हॉस्पिटलमध्ये कसल्टंट यूरोलॉजिस्ट डॉ. रिचर्ड विनी सांगतात की, यूरिन पास करताना फेस तयार होणं सामान्य बाब आहे. यूरिन पास करताना काही प्रोटीनही शरीरातून बाहेर निघतात. ज्यामुळे फेस तयार होतो. यात घाबरण्यासारखं काही नाही.

पण जर फेस तयार होण्याचं प्रमाण खूप जास्त असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. याचा अर्थ तुमची किडनी योग्यप्रकारे काम कर नाहीये आणि शरीराच्या आत काहीना काही गडबड सुरू आहे.

डॉक्टरांनुसार, शरीराच्या फिटनेससाठी प्रोटीनचं योग्य प्रमाण कायम राहणं फार गरजेचं असतं. जेव्हा लघवीसोबत प्रोटीन किडनीमध्ये पोहोचतं तेव्हा किडनी त्यांना फिल्टर करून प्रोटीन रोखून धरते आणि यूरिनला पास होऊ देते. तरी यूरिनसोबत थोडेफार प्रोटीन रिलीज होता. ज्यात चिंतेची मोठी बाब नसते.

जास्त फेस तयार होणं धोक्याची घंटा

जर तुमच्या पास होणाऱ्या यूरिनमध्ये जास्त फेस तयार होत असेल तर याचा अर्थ हा होतो की, शरीरातून प्रोटीन जास्त प्रमाणात बाहेर येत आहे. म्हणजे दोन्ही किडनी आपलं काम योग्यप्रकारे करत नाहीयेत. त्या हळूहळू फेल होत आहेत. रिपोर्टनुसार, हा एक मोठा आणि महत्वपूर्ण संकेत आहे. ज्याद्वारे लोक जाणून घेऊ शकतात की, किडनी योग्यप्रकारे काम करत आहेत की नाही.

किडनी फेल होण्याच्या सामान्य कारणांमध्ये डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर यांचा समावेश असतो. जर ब्लडमध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी झालं तर याने शरीरात पाण्याचं प्रमाण अधिक होईल. ज्याने फुप्फुसं आणि पेल्विकसहीत शरीरातील इतरही अवयवांमध्ये सूज येईल. यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास समस्या होऊ लागते आणि त्यांचा मृत्यूचा धोका वाढतो.

हे संकेतही करू नका इग्नोर

जर तुमच्या लघवीतून दुर्गंधी येत असेल, लघवीतून रक्त येत असेल किंवा रंग बदललेला वाट असेल तर हेही किडनी फेल होण्याचे संकेत आहेत. ही लक्षणं दिसत असतील तर जराही वेळ न घालवता लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. टेस्ट करा. जेणेकरून वेळेवर उपचार सुरू होतील.

डायबिटीज होण्याची प्रमुख लक्षणं

- रात्री पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणं

- पुन्हा पुन्हा तहान लागणं

- सामान्यापेक्षा जास्त थकवा जाणवणं

- आपोआप वजन कमी होणं

- प्रायव्हेट पार्टमध्ये खाज

- जखमा बऱ्या होण्यास वेळ लागणे

- धुसर दिसू लागणे

डॉक्टरांनुसार, डायबिटीज एक अशा आजार आहे ज्याने जगभरातील मोठ्या संख्येने लोक ग्रस्त आहेत. पण त्यांना या आजाराबाबत माहिती नाही. या आजाराने अनेक प्रकार असतात. जे कंट्रोल करण्यासाठी उपचाराचे वेगवेगळे प्रकार वापरले जातात. एक्सपर्ट सांगतात की,  जर एकदा डायबिटीज झाला तर हा आजार नष्ट केला जाऊ शकत नाही. पण वेगवेगळे उपाय करून आणि योग्य ती काळजी घेऊन त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं जाऊ शकतं.
 

Web Title: Health Tips : Sign of kidney failure, diabetes, high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.