ऑफिस असो वा घर जास्त वेळ एकाच जागी बसल्याने होतात हे गंभीर आजार, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 10:05 AM2023-07-27T10:05:41+5:302023-07-27T10:06:49+5:30

Health Tips : ऑफिसमध्ये सतत तासंतास काम करत बसणारे आणि तासंतास टीव्ही किंवा कॉम्प्युटरसमोर चिकटून राहणाऱ्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता वाढली आहे.

Health Tips : Sitting for too long without movement is affecting your heart health elevated blood pressure plaque buildup in arteries | ऑफिस असो वा घर जास्त वेळ एकाच जागी बसल्याने होतात हे गंभीर आजार, वेळीच व्हा सावध!

ऑफिस असो वा घर जास्त वेळ एकाच जागी बसल्याने होतात हे गंभीर आजार, वेळीच व्हा सावध!

googlenewsNext

Health Tips : ऑफिस डेस्कवर जास्त वेळ बसून काम करणं, घरात जास्त वेळ बसून टीव्ही बघणं किंवा सतत बसून राहणं यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. तुम्हाला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका अधिक असतो. मद्यसेवन, धुम्रपान आणि जंक फूड खाण्यासोबतच जास्त वेळ एकाच जागी बसणं धोकादायक ठरतं. जेव्हा तुम्ही एकाच जागी जास्त वेळ बसता तेव्हा तुमच्या कॅलरी तर वाढतातच सोबतच हाडे आणि मसल्समध्ये समस्या होतात.

सामान्य लोकांच्या तुलनेत या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता 61 टक्के वाढते. वॉशिंग्टन पोस्ट आणि हफपोस्टमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, जे लोक लागोपाठ सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बसून काम करतात त्यांना कॅन्सर, मधुमेह, हृदय विकाराचा झटका, मांसपेशी किंवा हाडांसंबंधी गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त टक्क्यांनी वाढते. 

यूनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कारोलियाचे प्राध्यापक स्टेवन ब्लेअर यांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन 40 वर्ष यावर अभ्यास केला. ब्लेअर म्हणाले की, 'हे खरं आहे की, व्यायाम करुन आपण अनेक प्रकारच्या आजारांना दूर ठेवू शकतो. पण याचा अर्थ असा होत नाही की, लागोपाठ बसून काम करणे किंवा टीव्ही बघणे यांपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करता येईल. 

जास्त वेळ बसून काम केल्याने किंवा नुकते बसल्याने आपल्या शरीरातील मांसपेशी क्रियाशील राहत नाहीत. या कारणाने आपल्या मेंदुला शुद्ध रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही. ब्लेअर यांनी हेही सांगितले की, फार जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरातील फॅट फार कमी बर्न होतात आणि ज्या कारणाने फॅटी अॅसिड हृदयाची कार्यप्रणालीत अडचण निर्माण होते. 

जास्त वेळ बसून राहिल्याने रक्तदाब वाढतो आणि खराब कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते. त्यासोबतच वेगवेगळे कॅन्सर आणि इतरही काही गंभीर आजार होऊ शकतात. या कारणाने शरीराची पचनक्रिया बिघडते आणि अधिक इन्सुलिन तयार होऊ लागतं.

तसेत दुसऱ्या एका शोधातून असे समोर आले की, जगात होणाऱ्या मृत्यूंमध्ये 4 टक्के मृत्यू हे जास्त वेळ बसून राहिल्याने होतात. अमेरिकन जर्नल ऑफ प्रिवंटीव मेडिसीनमध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे. या शोधानुसार, जगात होत असलेले 4 टक्के मृत्यू हे तीन तासांपेक्षा जास्त बसून राहिल्याने शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे होतात. या शोधामध्ये 54 देशांत केलेल्या सर्वेक्षणाचं विश्लेषण करुन हा निष्कर्ष काढण्यात आलाय. 

शोधानुसार, जर तुम्ही पूर्ण दिवस लागोपाठ तीन तास बसत नसाल तर तुमचं आयुष्य वाढतं. सर्वेक्षणानुसार, रोज तीन तासांपेक्षा कमी बसून राहणाऱ्यांचं आयुष्यात 0.2 वर्षांची वाढ होते. ब्राझिलच्या यूनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो स्कूल ऑफ मेडिसीनच्या अभ्यासकांना या अभ्यासात असे आढळले की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि रोगांना दूर ठेवण्यासाठी लागोपाठ तीन तास बसून काम करु नये. 

Web Title: Health Tips : Sitting for too long without movement is affecting your heart health elevated blood pressure plaque buildup in arteries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.