मेंटल हेल्थ बिघडण्यासाठी 'ही' गोष्ट ठरतेय कारणीभूत; आताच विचार करा नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 12:27 PM2024-05-25T12:27:05+5:302024-05-25T12:39:46+5:30
बहुतेक तरुण अभ्यास, मैत्री, कुटुंब किंवा इतर गोष्टींपासून विचलित होऊ लागतात. यामुळे ते एकाकी पडतात आणि मानसिक समस्यांना बळी पडतात.
स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे तरुणाईचा सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर जातो. हा आता आयुष्याचा एक भाग बनला आहे. सोशल मीडियावर सतत वेळ घालवल्याने तरुणांच्या मनावर परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.
एका अभ्यासातून समोर आलं आहे की, सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये तणाव झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. सोशल मीडिया आणि तणाव यांच्यातील कनेक्शन जाणून घेऊया.
सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याने, बहुतेक तरुण अभ्यास, मैत्री, कुटुंब किंवा इतर गोष्टींपासून विचलित होऊ लागतात. यामुळे ते एकाकी पडतात आणि मानसिक समस्यांना बळी पडतात. ते सहसा सोशल मीडियावर इतरांशी स्वतःची तुलना करू लागतात, ज्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो, ज्यामुळे तणाव वाढू शकतो.
रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याने तरुणाईचा दिनक्रम बिघडल्याचं आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणं आहे. यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही आणि त्यांची चिडचिड वाढत आहे. मोबाईल स्क्रीन आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे झोपेला मदत करणारा हार्मोन मेलोटोनियम बाहेर पडत नाही आणि नंतर समस्या वाढू लागतात.
सोशल मीडियामुळे तणाव वाढण्याची 4 कारणं
1. सोशल मीडियाचा वापर केल्याने तरुणांना आपल्यात काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. त्यांच्या या भीतीला FOMO (फिअर ऑफ मिसिंग आउट) म्हटलं जातं, ज्यामुळे मानसिक तणाव आणि चिंता वाढू शकते.
2. अनेक वेळा तरुणांना सोशल मीडियावर ऑनलाइन छळ आणि धमक्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो.
3. सोशल मीडियाचा सतत वापर केल्याने झोप कमी होऊ शकते. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने थकवा, लक्ष न लागणे आणि चिडचिडेपणा येऊ शकतो, ही तणावाची लक्षणे आहेत.
4. सोशल मीडिया तरुणांना वास्तविक जगापासून वेगळं करत आहे, त्यांना सामाजिकदृष्ट्या एकटेपणाची भावना निर्माण करत आहे, ज्यामुळे तणाव वाढू शकतो.
सोशल मीडियाचा प्रभाव कसा टाळावा?
1. सोशल मीडियाला एका दिवसात किंवा आठवड्यात किती वेळ द्यायचा हे ठरवा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा.
2. कुटुंब आणि मित्रांसह वेळ घालवा.
3. सोशल मीडियावर इतरांचे फोटो पाहून स्वतःची तुलना करणे टाळा.
4. तुमच्यासाठी समस्या निर्माण करणाऱ्या सर्व पोस्टपासून अंतर ठेवा.