सतत एसी-कुलरची हवा खाणे तुम्हाला पडू शकते महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 01:23 PM2018-06-18T13:23:42+5:302018-06-18T13:23:42+5:30

गरमीत एसी किंवा कुलरचा वापर पूर्णपणे बंद करता येत नाही. पण वापर कमी केला जाऊ शकतो. याने आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.

Health Tips : Staying in air conditioning all the time has many side effects | सतत एसी-कुलरची हवा खाणे तुम्हाला पडू शकते महागात!

सतत एसी-कुलरची हवा खाणे तुम्हाला पडू शकते महागात!

googlenewsNext

(Image Credit: www.avoskinbeauty.com)

गरमी कमी असो वा थंडी काही लोकांना सतत एसीमध्ये राहण्याची सवय असते. घर, ऑफिस, कार प्रत्येक ठिकाणा काही लोक एसीमध्येच राहतात. असा लोकांसाठी एसीशिवाय राहणं जरा कठीणच होऊन बसतं. पण ही सवय आपल्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव करते. गरमीत एसी किंवा कुलरचा वापर पूर्णपणे बंद करता येत नाही. पण वापर कमी केला जाऊ शकतो. याने आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. चला जाणून घेऊया काय होतो एसी-कुलरचा आरोग्यावर परिणाम...

सतत आजारी पडण्याचे कारण

एका रिसर्चनुसार, गारवा देणारा एसी आपल्या आरोग्यासाठी फारच घातक आहे. एसी आपल्या आजूबाजूला एक आर्टीफिशिअल टेम्परेटर तयार करतो, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे तुम्ही सतत आजारी पडता. जे लोक रोज एसीमध्ये 4 तासांपेक्षा जास्त वेळ घालवणाऱ्या लोकांना सायनस होण्याची शक्यता असते. कारण थंडीमुळे हवा म्यूकस ग्रंथी कठोर बनतात. त्यामुळे फंगल इन्फेक्शनचाही धोका असतो. 

कुलर किंवा एसीच्या थंडीत अंगावर काहीही पांघरुन न घेतल्यास दम्याच्या रुग्णांना अधिक त्रास होऊ शकतो. त्यांना छातीत फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. 

सांधेदुखी-अंगदुखी

एसी आणि कूलरच्या थंड हवेमुळे सांधेदुखीची समस्या होऊ शकते. त्यासोबतच मान, हाथ आणि टोंगळ्यांमध्येही वेदना होतात. जर हे दुखणं जास्त काळासाठी राहिलं तर याने मोठी समस्या निर्माण होऊ शकते. 

वजन वाढणे

जास्तवेळ एसी किंवा कुलरमध्ये बसल्यास जाडपण वाढतो. थंड वातावरणामुळे शरीरातील ऊर्जा खर्ची होत नाही. त्यामुळे शरीरातील चरबी वाढते. 

मांसपेशी आकुंचन पावतात

सतत एसी असलेल्या ठिकाणी बसल्याने मांसपेशी आकुंचन पावतात. यामुळे डोकेदु:खीही वाढते.

ड्राय स्किनची समस्या

जास्तवेळ एसी किंवा कुलरच्या हवेत बसल्याने स्किन ड्राय होते. त्यामुळे 1-2 तासांमध्ये मॉइस्चरायजर लावावे. असे केल्यास स्किन कोरडी पडणार नाही. 

Web Title: Health Tips : Staying in air conditioning all the time has many side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.