भातासहीत हे पदार्थ पुन्हा चुकूनही करू नका गरम, होऊ शकतात गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 10:40 AM2023-05-01T10:40:40+5:302023-05-01T10:40:55+5:30

Health Tips : भातासहीत 4 पदार्थ चुकूनही दुसऱ्या दिवशी  गरम करून खाऊ नये. कारण ते पुन्हा गरम केल्याने ते विष बनण्याची शक्यता जास्त असते. याने गंभीर आजारही होऊ शकतात.

Health Tips : These four foods become poisonous after reheat the next day | भातासहीत हे पदार्थ पुन्हा चुकूनही करू नका गरम, होऊ शकतात गंभीर समस्या

भातासहीत हे पदार्थ पुन्हा चुकूनही करू नका गरम, होऊ शकतात गंभीर समस्या

googlenewsNext

Health Tips : आपल्याकडे अशी परंपरा आहे की, जेवण नेहमी ताजं वाढलं जातं. डॉक्टरही सांगतात की, ताजं जेवण केल्याने व्यक्ती नेहमी बॅक्टेरियापासून मुक्त राहतो. पण आजकाल सगळेच नोकरी करतात. अशात कुणाकडेही इतका वेळ नाही की, ते दोन्ही वेळचं जेवण तयार करू शकतील. जास्तीत जास्त लोक सकाळी तयार केलेलं जेवण सायंकाळी आणि सायंकाळी तयार केलेलं सकाळी गरम करून खातात. पण जर तुम्ही असं करत असाल तर वेळीच सावध व्हा. एक्सपर्टनुसार, भातासहीत 4 पदार्थ चुकूनही दुसऱ्या दिवशी  गरम करून खाऊ नये. कारण ते पुन्हा गरम केल्याने ते विष बनण्याची शक्यता जास्त असते. याने गंभीर आजारही होऊ शकतात.

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, काही दिवसांआधी टिकटॉकवर बऱ्याच लोकांनी यावरून प्रश्न उपस्थित केला होता. काही लोक म्हणाले होते की, भात खातच त्यांना फूड पॉयजनिंग झालं. काही लोकांना साखर खाल्ल्यावर समस्या झाली. त्यानंतर एक्सपर्टसोबत बोलण्यात आलं. ऑस्‍ट्रेलियाची डायटीशिअन किम लिंडसेने सांगितलं की, 4 फूड चुकूनही गरम करू नये. हे पदार्थ दुसऱ्या दिवशी गरम करून खाणं म्हणजे धोक्याची घंटा आहे. 

अंड्यात वेगाने पसरतात बॅक्टेरिया 

किम लिंडसेने सांगितलं की, अंडी पुन्हा कधीच गरम करू नये. अंडी गरम केल्यावर त्यात साल्मोनेला बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. हे फूड पॉयजनिंगचं सगळ्यात मोठं कारण असतं. 20 डिग्री ते 73 डिग्री सेल्‍स‍िअसच्या तापमानात हा बॅक्टेरिया वेगाने पसरतो. अंडी किंवा अंड्याचे पदार्थ 2 तासांपेक्षा जास्त किंवा उन्हाळ्यात 1 तासांपेक्षा जास्त वेळ फ्रिजच्या बाहेर ठेवू नये.

भाताला गरम करणं धोकादायक

भिजवलेल्या भातामध्येही बेलिलस सेरेस नावाचा बॅक्टेरिया असतो. सामान्यपणे हे बॅक्टेरिया माती आणि भाज्यांमध्ये असतात. बटाटे, मटर, बीन्स आणि काही मसाल्यांमध्ये हे बॅक्टेरिया असतात. किम लिंडसेनुसार, जसेही तुम्ही भात पुन्हा गरम करता तेव्हा हे बॅक्टेरिया वेगाने पसरतात आणि फूड पॉयजनिंग होऊ शकतं. तुम्ही तांदूळ धुता पण यात बॅक्टेरिया लपून राहतात. त्यामुळे भात पुन्हा कधीच गरम करून खाऊ नये.

पालक गरम केल्याने कॅन्सरचा धोका?

किम लिंडसेने सांगितलं की, पालक पुन्हा गरम केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो असा दावा केला जातो. पालकसारख्या हिरव्या पालेभाजीमध्ये नाइट्रेट नावाचं तत्व असतं. जेव्हा नाइट्रेट्स गरम केलं जातं तेव्हा ते इतर तत्वांसोबत मिळतं. ज्याने कॅन्सरचा धोक वाढू शकतो. नाइट्रेट हानिकारक नाही पण जेव्हा हे तत्व आधी तोंडात असणाऱ्या बॅक्टेरिया आणि शरीरातील एंजाइमसोबत मिळतं तेव्हा ते तत्व नाइट्रोसामायनमध्ये बदलतं जे कॅन्सरचं मुख्य कारक आहे.

बटाटे 2 तासांपेक्षा जास्त रूमच्या तापमानात ठेवू नका

तसेच बटाटेही जास्त गरम करू नये. रूमच्या तापमानातही बटाटे 2 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवले तर बटाट्यामध्ये क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचा बॅक्टेरिया तयार होतो. हा बॅक्टेरिया थेट शरीरातील नसांवर हल्ला करतो. तुम्हाला याने श्वास घेण्यासही समस्या होऊ शकते. यामुळे उलटी, मळमळ, पोटदुखी होऊ शकते. काही केसेसमध्ये मृत्यूचाही धोका असतो.

Web Title: Health Tips : These four foods become poisonous after reheat the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.