Health Tips : जेवणानंतर लगेच या गोष्टी करणं तुमच्यासाठी ठरू शकतं धोकादायक, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 03:22 PM2022-08-25T15:22:12+5:302022-08-25T15:22:28+5:30

Health Tips : एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणानंतर काय करावे? काय करु नये? यातील जेवणानंतर तुम्ही काय टाळावं हे आज आम्ही सांगणार आहोत. जेवणानंतर लगेच काय करु नये हे खालीलप्रमाणे सांगता येईल.

Health Tips : These things you should not do after full meal | Health Tips : जेवणानंतर लगेच या गोष्टी करणं तुमच्यासाठी ठरू शकतं धोकादायक, जाणून घ्या कारण...

Health Tips : जेवणानंतर लगेच या गोष्टी करणं तुमच्यासाठी ठरू शकतं धोकादायक, जाणून घ्या कारण...

Next

Health Tips : आपल्या दैनंदिन जीवनात आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवावं याकडे फार कुणी लक्षच देत नाहीत. असंही म्हणता येईल की, या धावपळीच्या जगण्याक अनेकांना ते शक्यही होत नाही. छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणानंतर काय करावे? काय करु नये? यातील जेवणानंतर तुम्ही काय टाळावं हे आज आम्ही सांगणार आहोत. जेवणानंतर लगेच काय करु नये हे खालीलप्रमाणे सांगता येईल.

१) लगेच झोपू नये:

अनेकांना जेवण झाल्या झाल्या झोपण्याची सवय असते. मात्र, हे चुकीचं आहे. कारण अन्नाचं पचन व्हायला काही वेळ लागतो, त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे गॅस आणि आतड्यांना त्रास व्हायची शक्यता वाढते. त्यामुळे झोपण्यासाठी थोडा वेळ घ्या. थोडावेळ फिरून या.

२) सिगारेट ओढू नये:

अनेकांना जेवल्यावर लगेच सिगारेट हवी असते. पण असे करणे जास्त घातक आहे. सिगारेटमुळे हृदय आणि श्वसनासंबंधी आजार होतात. जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढणे हे जास्त धोकादायक असल्याची माहिती डॉक्टर देतात. जेवल्यानंतर लगेच सिगरेट प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोकाही मोठ्याप्रमाणावर वाढतो.

३) लगेच आंघोळ करु नये:

आंघोळ करताना पाण्यामुळे शरीरावरील रक्ताचा संचार वाढतो, याचा परिणाम पोटावर होतो आणि पचनक्रियाही त्यामुळे प्रभावित होते. जेवणानंतर लगेच आंघोळ करणे यामुळे टाळावे.

४) जेवल्यानंतर लगेच फळं खाऊ नये:

जेवणाबरोबरच तुम्ही फळं खात असाल तर या फळांचं पोषण पूर्ण मिळत नाही. ही फळं पोटामध्येच चिटकून राहतात आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जेवण झाल्यावर एका तासाने फळे खाल्ली पाहिजेत.

५) चहा पिऊ नका

चहापत्तीमध्ये सर्वाधिक आम्लाचं प्रमाण असतं, यामुळे प्रोटीनच्या पचनावर परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच चहा पिणं टाळा.

Web Title: Health Tips : These things you should not do after full meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.