Health Tips : ...तर हे आहे टायगर श्रॉफचे फिटनेस रहस्य !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2017 01:27 PM2017-06-01T13:27:24+5:302017-06-01T18:57:24+5:30
टायगरने फिटनेसच्या काही टिप्स सांगितल्या असून त्या फॉलो केल्यास आपणही आपले व्यक्तिमत्व आकर्षक करू शकता.
Next
‘हीरोपंती’ या चित्रपटाद्वारे आपल्या करियरची सुरुवात करणारा टायगर सध्या हॉलीवूडच्या ‘रँम्बो’ या गाजलेल्या सिनेमाच्या बॉलीवूडमधील रीमेक मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात टायगर मुख्य भूमिका साकारणार असून त्याच्या फिटनेसमुळे त्याची निवड झाली असल्याची चर्चा आहे. टायगर आपल्या फिटनेससाठी खूपच काळजी घेत असतो. त्याने आपल्या चाहत्यांसाठीदेखील फिटनेसच्या काही टिप्स सांगितल्या असून त्या फॉलो केल्यास आपणही आपले व्यक्तिमत्व आकर्षक करू शकता.
* टायगर श्रॉफने दिलेल्या खास टिप्स
* टायगर कामाचा ताण कधीही घेत नाही शिवाय कितीही जबाबदारी वाढली तरी व्यायाम करायला कधीही विसरत नाही. यामुळे प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे फार गरजेचे आहे. टायगर रोज २ तास व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो. व्यायामुळे तुम्ही आकर्षक दिसण्यासोबत शरिरातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. त्यामुळे तुमचे स्वास्थ उत्तम राहते.
* टायगर सुंदर आणि ताजेतवाने दिसण्यासाठी नियमित पौष्ठिक आहार घेतो. जर आपण योग्य आहार घेतला नाही तर आपला व्यायाम करण्याचा काहीच फायदा होणार नाही. आहारात भरपूर प्रोटीन आणि विटामिन असलेला पदार्थांचा समावेश करा. रोजच्या आहारात सुकामेवा, अंडी, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, मांस आणि मासे यांचा समावेश असावा. जेवढे शक्य असेल तेवढे बाहेरचे खाणे टाळा. टायगर शरिरातून घातक गोष्टींचे उत्सर्जन करण्यासाठी दिवसातून ३ ते ४ वेळा ग्रीन टी घेतो.
* टायगर श्रॉफ नितळ कांतीसाठी भरपूर पाणी आणि पुरेशी झोप घेतो. याचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. अभिनय क्षेत्रामध्ये टायगरला कडक उन्हात स्टंट करावे लागतात, नाचावे लागते, गुंडाशी दोन हात करावे लागते. त्यामुळे त्याला प्रत्येक वेळेस ताजेतवाने दिसणे गरजेचे आहे.
* टायगर नेहमी त्वचेसाठी हानीकारक नसतील अशीच सौदर्यप्रसाधने वापरतो. टायगर सध्या एका विशिष्ट कंपनीचा फेसवॉश वापरतो. ज्यामध्ये मॅचा ग्रीन टी असते. ज्यामुळे चेहरा स्वच्छ होतो. तो दिवसातून फक्त २ वेळा याचा वापर करतो.
Also Read : First look out : टायगर श्रॉफचा थक्क करणारा ‘रॅम्बो’चा फर्स्ट लुक रिलीज!