चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी खास उपाय,चेहरा दिसेल सुंदर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 11:06 AM2022-10-22T11:06:12+5:302022-10-22T11:27:53+5:30

चेहऱ्यावरील सूज कशी कमी करायची? असा प्रश्न उभा राहतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर काही खास उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या सोप्या उपायांनी तुम्ही चेहऱ्यावरील फॅट म्हणजेच चरबी बर्न करू शकता.

Health tips to lose fat from your face | चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी खास उपाय,चेहरा दिसेल सुंदर...

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी खास उपाय,चेहरा दिसेल सुंदर...

googlenewsNext

वजन कमी करणे किंवा फॅट बर्न करणे हे एक अवघड काम असतं. जर चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर ही गोष्ट आणखीनच कठीण आहे. पण अशक्य नक्कीच नाही. शरीराचं वजन कमी करण्यासाठी लोकांना उपाय माहीत असतात किंवा त्यांनी ऐकलेले असतात. पण चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी त्यांना योग्य ते उपाय माहीत नसतात. सूजलेला किंवा चरबीमुळे फुगलेला चेहरा फारच बेढब दिसतो. अशात चेहऱ्यावरील सूज कशी कमी करायची? असा प्रश्न उभा राहतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर काही खास उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या सोप्या उपायांनी तुम्ही चेहऱ्यावरील फॅट म्हणजेच चरबी बर्न करू शकता.

फेशिअल एक्सरसाइज

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी फेशिअल एक्सरसाइज केली जाते. वाढत्या वयासोबत चेहऱ्याची त्वचा ताणलेली किंवा तजेलदार दिसण्यासाठीही फेशिअल एक्सरसाइज फार फायदेशीर मानली जाते. काही रिसर्चमधून समोर आले आहे की, जर रोज फेशिअल एक्सरसाइज केली तर चेहऱ्यावरील चरबी कमी केली जाऊ शकते. फेशिअल एक्सरसाइज सामान्यपणे तोंडात हवा भरून ती आत-बाहेर करणे किंवा वर-खाली करणे अशी केली जाते. मात्र, ही एक्सरसाइज फिटनेस एक्सपर्टच्या सल्ल्यानेच करावी.

कार्डिओ एक्सरसाइज

शरीरात जेव्हा अधिक फॅट असतं, तेव्हा ते चेहऱ्यावरही दिसतं. जास्त लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरही चरबी असते. फिटनेस एक्सपर्टनुसार, फॅट बर्न करणारी एक्सरसाइज करून चेहऱ्यावरील फॅट कमी होतं. कार्डिओ एक्सरसाइज आणि एरोबिक एक्सरसाइजकडे फॅट बर्न करणाऱ्या एक्सरसाइज म्हणून पाहिलं जातं.

एक्सपर्ट्सनुसार, एक्सरसाइज हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी किंवा वेगवान करण्यास मदत करते. ज्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. तुम्हाला फॅट बर्न करायचं असेल तर कार्डिओ एक्सरसाइज रोज करू शकता. यात प्रामुख्याने धावणे, सायकलिंग, स्वीमिंग यांचा समावेश असतेो.

पाण्याचे सेवन करा

वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं फायद्याचं ठरतं. वेगवेगळ्या डाएट एक्सपर्ट्ससोबतच वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हेच सांगण्यात आलं आहे. जर तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर दिवसभरात भरपूर पाण्याचं सेवन करत रहावं.

एका रिसर्चनुसार, जर सकाळी नाश्त्याआधी रोज अधिक पाण्याचं सेवन केलं तर १३ टक्के जास्त कॅलरी बर्न करता येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या हे लक्षात असायला पाहिजे की, डेली डाएटमध्ये पाण्याचंही प्रमाण योग्य असावं.

Web Title: Health tips to lose fat from your face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.