Health Tips : सतत थकवा जाणवतो का? 'या' चुकीच्या कारणांमुळे आरोग्य येतंय धोक्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 11:49 AM2022-03-01T11:49:45+5:302022-03-01T11:51:47+5:30
Feeling Tired : ब्रिटनमध्ये पाच लोकांपैकी एका व्यक्तीला नेहमीच थकवा जाणवतो. यात जास्तीत जास्त महिलांचा समावेश आहे. त्यामुळे चला जाणून घेऊ तुम्हाला सतत थकवा का जाणवतो आणि हा थकवा रोखण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?
Feeling Tired : तुम्हाला अनेकदा अनुभव आला असेल की तुम्हाला नेहमीच थकवा जावणतो. पण कधी विचार केलाय का की, तुम्हाला नेहमी थकवा का जावणतो? यामागे कारण आहे. तुमच्या चुकीच्या खाण्या-पिण्यामुळेही तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो. 'मिरर'च्या एका रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये पाच लोकांपैकी एका व्यक्तीला नेहमीच थकवा जाणवतो. यात जास्तीत जास्त महिलांचा समावेश आहे. त्यामुळे चला जाणून घेऊ तुम्हाला सतत थकवा का जाणवतो आणि हा थकवा रोखण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?
चुकीचा आहार
सतत थकवा जाणवत असेल तर दुपारच्या जेवणात चुकीचं काही खाणं हे मुख्य कारण असू शकतं. रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही पोषक तत्व नसलेल्या पदार्थांचं सेवन करत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. रिपोर्ट्सनुसार, जास्तीत जास्त लोक एनर्जीसाठी शुगर असलेल्या पदार्थांचं जास्त सेवन करतात. त्यासोबतच अनेक लोक बिझी असल्या कारणाने नाश्ता करत नाहीत. अशात ते व्हाइट ब्रेड किंवा कुरकुरे खातात. जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात.
एक्सरसाइज न करणे
जास्तीत जास्त लोक टीव्ही बघत बसतात आणि एक्सरसाइज करत नाहीत. सर्वांनाच माहीत आहे की, लाइफस्टाईलमध्ये मोबाइल-टीव्हीमुळे फिजिकल अॅक्टिविटी कमी होते. हेच कारण आहे की, तुम्हाला अॅक्टिव राहण्याऐवजी जास्त थकवा जाणवतो.
कॅफीनचं जास्त सेवन
फार जास्त कॅफीनचं सेवन केल्यानेही तुम्हालाही थकवा जाणवू शकतो. आजकाल लोक त्यांचा थकवा दूर करण्यासाठी कॉफी किंवा चहाचं सेवन जास्त प्रमाणात करतात. पण हे नुकसानकारक आहे. अशात प्रयत्न करा की, कमी प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात कॅफीनचं सेवन करा.