रोज १ ग्लास तुळशीच्या दुधाचे सेवन कराल; तरच प्रतिकारशक्ती वाढवून संक्रमणाशी लढू शकाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 03:56 PM2020-06-17T15:56:25+5:302020-06-17T15:56:46+5:30

नुसते दूध पिण्यापेक्षा तुळशीचे दूध प्यायल्याने तुम्ही स्वतःची रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवू शकता.

Health Tips : Tulsi milk health benefits immunity booster | रोज १ ग्लास तुळशीच्या दुधाचे सेवन कराल; तरच प्रतिकारशक्ती वाढवून संक्रमणाशी लढू शकाल 

रोज १ ग्लास तुळशीच्या दुधाचे सेवन कराल; तरच प्रतिकारशक्ती वाढवून संक्रमणाशी लढू शकाल 

Next

तुळशीत अनेक आयुर्वेदिक गुण असतात. अनेक तज्ज्ञांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी  आणि रोगप्रतिकारकशक्ती  चांगली ठेवण्यासाठी  तुळशीचे सेवन करण्याचे आवाहन केले होते. तुळशीचे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहितच असतील. आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या दुधाच्या सेवनाने फायदे सांगणार आहोत.

नुसते दूध पिण्यापेक्षा तुळशीचे दूध प्यायल्याने तुम्ही स्वतःची रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवू शकता.तुळशीच्या काढ्याचे सेवन शरीरासाठी चांगले असले तरी अनेकांना या काढ्याचे सेवन करायला आवडत नाही. काढा पिण्यापेक्षा दुधाचे सेवन केल्याने तुम्ही आजारांपासून चार हात लांब राहू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे तुळशीचे दूध. 

तुलसी मिल्क का सेवन से इम्यून सिस्टम मजबूत होता है- सांकेतिक तस्वीर

सगळ्यात आधी दिड ग्लास दूध उकळून घ्या उकळलेल्या दुधात ८ ते १० तुळशीची पानं घाला. हवं तर तुम्ही या दुधात हळद किंवा मध घालू शकता. दूध पूर्णपणे उकळल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर या दुधाचे सेवन करा. तुळशीच्या दुधाच्या सेवनाने मायग्रेनची समस्या दूर होते. तर तुम्हाला ही समस्या सतत उद्भवत असेल तर रोज एक ग्लास तुळशीचे दूध प्यायल्यास समस्या कमी होईल.

तुळशीच्या सेवनाने फायदे

तुळशीचे दूध  किंवा चहा तयार करून प्यायल्याने शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांसाठी तुळश अत्यंत फायदेशीर ठरते. 

तुलसी मिल्क का सेवन हार्ट के लिए फायदेमंद होता है- सांकेतिक तस्वीर

तुळशीची पानं, आलं आणि जेष्ठमध बारिक करून त्यामध्ये मध एकत्र करून खा. त्यामुळे ताप, डोकेदुखी, घशात होणारी खवखव, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर होतात. 

तुळशीच्या पानांच्या अर्कात मध एकत्र करून प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. त्याचबरोबर क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, अस्थमा यांसारख्या श्वासाशी निगडीत आजारांवरही फायदेशीर ठरतो. 

सर्दी- जुकाम में तुलसी मिल्क का सेवन करना फायदेमंद होता है- सांकेतिक तस्वीर

तुळस एक नैसर्गिक डिटॉक्सीफाइंग, क्लिंजिंग आणि प्यूरिफाइंग एजंट आहे. ज्यामुळे शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे तुम्ही अनेक समस्यांपासून बचाव करू शकता. त्याचबरोबर लिव्हर डिटॉक्स करण्यासाठीही तुळस मदत करते. 

दररोज तुळशीच्या १० ते १२ पानांचं सेवन करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबुत होण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होते.

तुलसी

तुळस कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. तुळशीची पानं हृदयासाठी एका टॉनिकच्या स्वरूपात काम करतात. 

कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुळशीची पानं हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर यामध्ये एनलजेसिक इफेक्ट असतो. जो वेदना आणि सूज दोन्ही कमी करण्यासाठी मदत करतो

मास्क लावल्यानंतरही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? तज्ज्ञांनी सांगितले यामागचं कारण

चिंता वाढली! इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या पाचपैकी एका रुग्णाला कोरोना संक्रमणाचा धोका

Web Title: Health Tips : Tulsi milk health benefits immunity booster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.