आपल्या आजूबाजूच्या 'या' ६ गोष्टींमुळे वाढते थायरॉइडची समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 10:55 AM2018-07-12T10:55:04+5:302018-07-12T10:55:09+5:30
आपल्या आजूबाजूला काही अशाप्रकारचे विषारी पदार्थ किंवा वस्तू असतात ज्यामुळे थायरॉइडची समस्या वाढते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू....
थायरॉइडची समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात बघायला मिळत आहे. तसा तर थायरॉइड हा आजार अनुवांशिक मानला जातो पण शरीरात आयोडिनच्या कमतरतेमुळेही हा आजार होतो. महत्त्वाची बाब म्हणजे थायरॉइडबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. पण थायरॉइड वाढतो कशाने याचाही विचार करणे गरजेचे आहे. थायरॉइड आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंमुळे अधिक वाढतो. पण हे अनेकांना माहितीच नसतं. आपल्या आजूबाजूला काही अशाप्रकारचे विषारी पदार्थ किंवा वस्तू असतात ज्यामुळे थायरॉइडची समस्या वाढते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू....
१) परकोलोरेट्स
एका रिपोर्टनुसार प्रत्येकाच्याच शरीरात परकोलोरेट्स आढळतात. परकोलोरेट्स हे रॉकेट, जेट फ्यूल आणि कार एअर बॅग्स तयार करण्यासाठी वापरलं जातं. हे टॉक्सिन पिण्याच्या पाण्यात आणि खाण्यातही आढळतं. यामुळे थायरॉइडचे ग्रंथी प्रभावित होतात आणि थायरॉइडचे लक्षणेही वाढतात.
२) पीसीबी एस
पोलीक्लोरीनेटेड बायफिनायल एक औद्योगिक रसायन आहे. हे रसायन १९७० पासून बॅन करण्यात आलंय. पण आजही याचे काही कण आपल्या वातावरणात आढळतात. असे आढळले आहे की, पीसीबी थायरॉइड हार्मोन्सता स्तर वाढवतं. या टॉक्सिनमुळे आपल्या लिव्हरचे एंजाइमही प्रभावित होतात.
३) डॉयस्किन
पीसीबी आणि डॉयक्सिन हे हार्मोन ग्रंथीला वाढण्यास अडचण निर्माण करतात. त्यासोबतच डॉयक्सिन एजेंट ऑरेंजचा प्राथमिक घटक आहे. एजेंट ऑरेंजमुळे थायरॉइडसंबंधी समस्या निर्माण होतात.
४) सोयाबिन
सोयाबिनच्या सेवनामुळे थायरॉइड ग्रंथीच्या सामान्य क्रियांवर प्रभाव पडतो. सोयाबिनच्या उत्पादनांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर थायरॉइडचं कारण ठरतात. अनेक शोधांमधून असे समोर आले आहे की, ज्या लहान मुलांना सोया दूध दिलं जातं त्यांना पुढे जाऊन थायरॉइडची सेवन होते.
५) पेस्टीसाइडस् (किटकनाशक)
किटकनाशकामुळे थायरॉइडची समस्या अधिक वाढते. किटकनाशकांमुळे थायरॉइडच्या ग्रंथीमधून निघणाऱ्या हार्मोन्सच्या निर्मितीवर प्रभाव टाकतं.
६) प्लॅस्टिक
प्लॅस्टिक हे आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. प्लॅस्टिकच्या बॉटल्समुळे थायरॉइडची समस्या अधिक वाढते. या बॉटलमधून विषारी रसायन आपल्या शरीरात जातात. याने थायरॉइडची समस्या वाढते.