फिट राहण्याच्या नादात 'असा' DIET करणं पडेल महागात; वाढू शकतो हाडं मोडण्याचा धोका

By manali.bagul | Published: November 25, 2020 03:42 PM2020-11-25T15:42:10+5:302020-11-25T15:59:37+5:30

Health Tips in Marathi : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं अलीकडेच केलेल्या एका संशोधनात मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत वेगन डाएट करणाऱ्यांमध्ये हाडं मोडण्याचा धोका ४५ टक्के अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Health Tips : Vegan diet cause higher risk of bone breaking said oxford study | फिट राहण्याच्या नादात 'असा' DIET करणं पडेल महागात; वाढू शकतो हाडं मोडण्याचा धोका

फिट राहण्याच्या नादात 'असा' DIET करणं पडेल महागात; वाढू शकतो हाडं मोडण्याचा धोका

Next

(Image Credit- laraphysiotherapy, Medical express clinic)

आपलं वजन नियंत्रणात असावं, बारिक शरीरयष्टी असावी असं अनेकंना वाटत असतं. त्यासाठी कोणी व्यायम करतं तर कोणी डाएट. डाएट करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते.  काहीजण डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट करतात तर काहीजण स्वतःचं खाण्यापिण्यात वेगवेगळे घटक कमी करून बारिक होण्याचा प्रयत्न करतात. डाएटच्या एका प्रकाराबात संशोधनातून एक खुलासा झाला आहे.   वेगनिझम ही संकल्पना चांगल्या दृष्टिकोनातून सुरू झाली असली तरी दीर्घकाळ याचा अवलंब करणाऱ्यांच्या हाडांच्या बळकटीवर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं अलीकडेच केलेल्या एका संशोधनात मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत वेगन डाएट करणाऱ्यांमध्ये हाडं मोडण्याचा धोका ४५ टक्के अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. बीएमसी मेडिसीन जर्नलमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नमूद केलेल्या या अभ्यासत वेगनिझमच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वेगनिझममध्ये बदल न केल्यास त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता यात व्यक्त करण्यात आली आहे. वेगन लोकांनी त्यांना पुरेसे कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन बी 12 कसं मिळेल याचा विचार करावा, असा सल्ला नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसने दिला आहे.

या संशोधनात ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या जवळपास ५० हजार लोकांनी सहभाग घेतला होता. शाकाहारी आणि जे लोक मासे खातात पण चिकन, मटण खात नाहीत, त्यांना हिप फ्रॅक्चर्सचा धोका मांसाहार करणाऱ्या लोकांपेक्षा अधिक आहे. अर्थात हा धोका कमी करता येतो जेव्हा आहारात कॅल्शियम, प्रथिने यांचा पुरेसा समावेश होतो आणि बॉडी मास इंडेक्स नियंत्रणात असतो.

या संशोधनाचे प्रखुख तज्ज्ञ  डॉ. टॅमी टोंग  यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशोधनात वेगवेगळ्या पद्धतीचा आहार घेणाऱ्या लोकांचे वर्गीकरण  करून त्यांच्यातील अंशतः आणि संपूर्ण फ्रॅक्चरचा धोका याबाबत सर्वसमावेशक अभ्यास करण्यात आला होता. डॉ. टोंग हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील नुफफिल्ड डिपार्टमेंट ऑफ पॉप्युलेशन हेल्थ विभागाचे न्युट्रिशनल एपिडेमिलॉजिस्ट आहेत. 

दिलासादायक! भारतात सगळ्यात आधी 'या' १ कोटी लोकांना कोरोनाची लस देणार; लसीकरणाची यादी तयार 

द इंडिपेंडटच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार वेगन सोसायटीने यावर्षी जाहीर केलेल्या सर्वेक्षणानुसार ब्रिटनमध्ये सध्या वेगनिझमचा कल वाढत असून २०१६ पासून  २०१९ पर्यंत इथं वेगन लोकांची संख्या दुप्पटीनं वाढून ६ लाखांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे वेगन आहाराची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी खाद्यपदार्थ उत्पादकांनी लाल मांसाची प्रतिकृती वाटेल अशा बीट ज्यूस वापरून केलेले रोल्स, बर्गर अशा खाद्यपदार्थांची निर्मिती करण्यावर भर दिला आहे.

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा सोपा फंडा; जाणून घ्या व्हिटामीन्सचा खजिना असलेल्या मटारचे फायदे

याआधीही अशा प्रकारचे संशोधन केले होते. कमी बीएमआयमुळे हिप फ्रॅक्चरचा धोका वाढतो, कॅल्शियम, प्रथिनं यांचं कमी प्रमाण असल्यास हाडं चांगली राहू शकत नाहीत असं दिसून आलं होतं. योग्य संतुलित आणि वनस्पतीजन्य आहार पोषणमूल्यं वाढवू शकतो. हृदयविकार, मधुमेह आदी आजारांचा धोका कमी करतो. असं डॉ. टॅमी टोंग  यांनी सांगितले होते. 

Web Title: Health Tips : Vegan diet cause higher risk of bone breaking said oxford study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.