थंडीच्या दिवसात छातीत कफ जमा झालाय? हे सोपे उपाय करून लगेच मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 12:42 PM2023-01-06T12:42:52+5:302023-01-06T12:43:17+5:30

Health Tips : तसं पाहिलं तर शरीर हेल्दी ठेवण्यासाठी कफ गरजेचा असतो. कारण कफ आपल्या फुप्फुसांमध्ये धुळीचे कण जमा होण्यापासून रोखतो आणि बॅक्टेरियापासूनही वाचवतो. 

Health tips vegetables to get rid of mucus in winter | थंडीच्या दिवसात छातीत कफ जमा झालाय? हे सोपे उपाय करून लगेच मिळेल आराम

थंडीच्या दिवसात छातीत कफ जमा झालाय? हे सोपे उपाय करून लगेच मिळेल आराम

Next

How To Get Rid Of Mucus: हिवाळ्यात सर्दी-खोकला होणं सामान्य बाब आहे. तेच बऱ्याच लोकांना हिवाळ्यात छातीत कफ जमा होण्याची समस्या होते. कफ आपल्या छातीत जमा होणारा एक चिकट पदार्थ आहे. तसं पाहिलं तर शरीर हेल्दी ठेवण्यासाठी कफ गरजेचा असतो. कारण कफ आपल्या फुप्फुसांमध्ये धुळीचे कण जमा होण्यापासून रोखतो आणि बॅक्टेरियापासूनही वाचवतो. 

पण कफ जर जास्त झाला तर याने वेगवेगळ्या समस्या होतात. यामुळे खोकला, घशात जळजळ, खवखव अशा समस्या होतात. अशात छातीत कफ जमा झाल्यावर खाण्या-पिण्यावर लक्ष द्यायला हवं. जर तुमच्याही छाती कफ जमा झाला असेल तर काही तो बाहेर काढण्यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत.

आलं

आल्याला नॅच्युरल डिकॉन्गेस्टेंटच्या रूपात जाणलं जातं. तेच छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी आल्याचं सेवन फायदेशीर ठरतं. कारण आल्यामध्ये अॅंटी-व्हायरल आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे घशात आणि छातीत जमा झालेला कफ सहजपणे बाहेर काढण्यास मदत मिळते. जर छातीत जमा कफ काढायचा असेल तर आल्याचं भाजीतून आणि चहातून सेवन करा.

कांदा

सर्दी-खोकला आणि छातीत जमा असलेला कफ दूर करायचा असेल तर कांद्याचा वापर करू शकता. कांदा ताप आणि गळ्यात खवखव असेल तेव्हाही फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला छातीत कफ असण्याची समस्या असेल तर कांदा बारीक करून 6 तास पाण्यात भिजवून ठेवा. या पाण्याचं रोज 3 चमचे सेवन करा. याने तुमचा कफ दूर होईल.

Web Title: Health tips vegetables to get rid of mucus in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.