कलिंगड खाताना 'ही' एक चूक करणं बेतू शकतं जीवावर; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 04:08 PM2024-06-06T16:08:12+5:302024-06-06T16:15:58+5:30

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा एक वेगळाच आनंद आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामध्ये असणारे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

health tips watermelon with salt side effects | कलिंगड खाताना 'ही' एक चूक करणं बेतू शकतं जीवावर; वेळीच व्हा सावध

कलिंगड खाताना 'ही' एक चूक करणं बेतू शकतं जीवावर; वेळीच व्हा सावध

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा एक वेगळाच आनंद आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामध्ये असणारे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कलिंगडचा रसही काही जणांना आवडतो. पण अनेक जण कलिंगडवर मीठ टाकतात. त्यामुळे कलिंगडचा गोडवा वाढतो असं त्याचं मत आहे. तर काही लोक हे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं म्हणतात. अशा परिस्थितीत कलिंगड हे मीठ घालून खावं की नाही हे जाणून घेऊया…

मीठ लावून कलिंगड खाण्याची कारणं 

1. मीठ कलिंगडचा कडवटपणा कमी करतो आणि गोडपणा वाढवतो.
2. मीठ कलिंगडाची चव वाढवतं.
3. मीठ कलिंगडला अधिक रसदार बनवतं.

मीठ लावून खाण्याचे फायदे

1. मीठ कलिंगडची गोडी वाढवतं आणि त्याची चव अप्रतिम लागते.
2. मीठामुळे कलिंगडातील पाणी बाहेर येतं आणि ते अधिक रसदार बनतं.

कलिंगडला मीठ लावून खाण्याचे तोटे

कलिंगड मीठ लावून खाल्ल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ब्लडप्रेशर वाढू शकतं. अति मीठामुळे बीपीच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे पोषणाच्या समस्याही उद्भवू शकतात. 

कलिंगडला मीठ लावावं की नाही?

कलिंगड हे कमी कॅलरी असलेलं फळ आहे, त्यात व्हिटॅमिन ए आणि सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. कलिंगडमध्ये थोडेसं मीठ घातल्याने त्याच्या पौष्टिकतेवर फारसा परिणाम होत नाही, परंतु जर तुम्ही दिवसभर सोडियमचे जास्त सेवन करत असाल तर समस्या वाढू शकतात. त्यामुळे मीठाचे संतुलन राखून कलिंगड खाण्यास हरकत नाही, फक्त जास्त मीठ खाणं टाळावं.

Web Title: health tips watermelon with salt side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.